पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NZvsIND: मैदानातील आक्रमकपणाच्या प्रश्नावर कोहली पत्रकारावर चिडला

विराट कोहली

न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्चच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात यजमानांनी तिसऱ्या दिवशीच पाहुण्या टीम इंडियाचा खेळ खल्लास करत मालिका २-० अशी खिशात घातली. कसोटी मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाज बॅकफूटवर खेळल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीची देखील किवी गोलंदाजांनी गोची केली.

IndvsNZ: भारतावर व्हाईटवॉशची नामुष्की, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवली. संपूर्ण मालिकेतील हा क्षण भारतीय संघाच्या बाजूने कलल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान याचवेळी न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार केन विल्यम्सन आणि लॅथम बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील त्याचा व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चाही रंगली. पण विराटला काही न्यूझीलंडच्या भूमीवर विजयाचे भाग्य लाभले नाही.  

Video : भन्नाट झेलनंतर जडेजाची 'कॅची फिलिंग'

दुसऱ्या कसोटीतील पराभवासह मालिका २-० अशी गमावल्यानंतर पत्रकार परिषदेत विराटने पराभवाचे खापर फलंदाजांवर फोडले. भारतीय फलंदाजांच्या निराशजनक कामगिरीमुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला, असे त्याने सांगितले. याच वेळी एका पत्रकाराने मैदानातील आक्रमक अंदाजावरुन विराटला बाऊन्सर मारला. यावर विराट चांगलाच भडकला. मैदानातील माझ्या वर्तनामुळे मॅच रेफ्रिंना कोणतीही समस्य नाही. संपूर्ण माहिती घेऊन प्रश्न विचारत जा! अशा शब्दांत विराटने पत्रकाराच्या बाऊन्सरवर फटकेबाजी केली. विराट कोहली पत्रकार परिषदेत भडकण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये १-४ अशी मालिका गमावल्यानंतर विराट पत्रकार परिषदेत भडकल्याचे पाहायला मिळाले होते. पराभवानंतर संयम ठेवून तो बोलू शकत नाही. हे कृत्यही  त्याच्या आक्रमक स्वभावाचे प्रतिक मानायचे का? हा प्रश्नच आहे.

NZvsIND 2nd Test: दबावात चुका करणाऱ्या विराटला पाहून बोल्ट सुखावला!

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::ind vs nz new zealand vs india test series virat Kohli loses cool in presser following Christchurch defeat