पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही

महेंद्रसिंह धोनी

ICC World Cup 2019: विश्वविक्रमवीर सचिन तेंडुलकरने २०१९ च्या आयसीसी विश्वचषकासाठी आपली प्लेईंग इलेव्हन टीम निवडली असून त्यात त्याने भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाचा समावेश केला आहे. सचिनने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. रवींद्र जडेजाने या विश्वचषकात फक्त दोन सामने खेळले आहेत. परंतु, सेमीफायनलमधील त्याच्या कामगिरीने सचिनला प्रभावित केले. 

सचिन तेंडुलकर रवींद्र जडेजाच्या कामगिरीमुळे इतका प्रभावित झाला की, त्याने त्याला जागतिक एकादश संघात स्थान दिले. विश्वचषकात समालोचन करत असलेल्या सचिनने जडेजाला आपल्या संघात सामावून घेतले. 'मला माहीत आहे की, लोक यावरुन मला अनेक प्रश्न विचारतील. पण सेमीफायनलमध्ये त्याने ७७ धावांची जी जबरदस्त खेळी केली, त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे,' असे सचिनने म्हटले.

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी

तो पुढे म्हणाला की, रवींद्र जडेजाची डावखुरी फिरकी गोलंदाजी पण चांगली आहे. तो माझ्या संघात असलेला आणखी एक डावखुरा फिरकीपटू शाकिब अल हसनबरोबर चांगली गोलंदाजी करेल.

सचिन तेंडुलकरने आपल्या जागतिक एकादश संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनला दिले आहे. त्याने सलामीवीराची जबाबदारी रोहित शर्मा आणि इंग्लंडचा जॉन बेअरस्टोकडे सोपवली आहे. तिसऱ्या क्रमांकार विल्यम्सन आणि चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहलीला उतरवणार आहे. 

....म्हणून सुपर ओव्हरमध्ये टाय होऊनही इंग्लंड विजयी!

मास्टर ब्लास्टरने पाचव्या क्रमांकावर बांगलादेशचा शाकिब आणि सहाव्या क्रमांकावर इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ठेवले आहे. सातव्या क्रमांकावर अष्टपैलू हार्दिक पांड्या, आठव्या क्रमांकावर जडेजा, नवव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क, दहाव्या क्रमांकावर इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि ११ व्या क्रमांकावर भारताचा जसप्रीत बुमराहला ठेवले आहे. 

सचिनचा प्लेईन इलेव्हन संघः रोहित शर्मा, जॉन बेअरस्टो, केन विल्यम्सन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

भारत फायनलमध्ये नसल्यानं स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधींचा फटका

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::ICC World Cup 2019 MS Dhoni is not the part of Sachin Tendulkar s World Cup XI virat kohli in the team but not the captain of team