पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सायना पहिल्याच फेरीत गारद, सिंधूची आगेकूच

पीव्ही सिंधू

भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार आणि ऑलिम्पिकपटू पीव्ही सिंधू आणि एच एस प्रणयने हाँगकाँग ओपनमध्ये विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तर दुसरीकडे सायन नेहवाल आणि समीर वर्मा यांचे आव्हान पहिल्या फेरीत संपुष्टात आले. 

INDvsBAN : कोणाला मिळणार संधी अन् कोण ठरणार भारी!

बॅडमिंटनच्या महिला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीत कोरियाच्या किम गा इयून ला २१-१५, २१-१७ अशा सरळसेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर  थायलँडच्या बुसानन बी हिच्याविरुद्ध रंगणार आहे. पहिल्या फेरीतील सामन्यात तिने सुरवातीपासून आक्रमक खेळ केल्याचे पाहायला मिळाले.  

INDvBAN: डे-नाइट टेस्टची वेळ ठरली!

सिंधू आणि किम यांच्यातील सामना अवघ्या ३६ मिनटांत संपुष्टात आला. दुसरीकडे पुरुष एकेरीत प्रणॉयने चीनच्या हुआंग यू शियॉगलला २१-१७, २१-१७ अशी मात दिली. प्रणॉयने ४४ मिनिटात प्रतिस्पर्धाचा खेळ खल्लास केला.