पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ASHES 2019: स्टिव्ह स्मिथचे २६ वे शतक, अनेक विक्रमांची केली नोंद

स्टिव्ह स्मिथ

जबरदस्त फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टिव्ह स्मिथने इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळल्या जात असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील २६ वे शतक ठोकले. या मालिकेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने एजबस्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत क्रमशः १४४ आणि १४२ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना २५१ धावांनी जिंकला होता. लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत स्मिथने पहिल्या डावात ९२ धावांची खेळी केली होती. 

जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर जखमी झाल्यामुळे त्याला दुसरा डाव आणि हेंडिग्लेमध्ये खेळली गेलेली तिसरी कसोटी खेळता आली नव्हती. लॉर्ड्स कसोटी अनिर्णीत राहिली होती. हेडिंग्ले कसोटीत बेन स्टोक्सच्या १३५ धावांच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर इंग्लंडने एक विकेटने विजय मिळवत मालिका १-१ अशी बरोबरी साधली होती. स्टिव्ह स्मिथने आपल्या २६ व्या कसोटी शतकाबरोबर अनेक विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. तो डॉन ब्रॅडमननंतर सर्वांत कमी डावांत २६ कसोटी शतक करणारा फलंदाज ठरला आहे. 

सर्वांत कमी डावांत २६ कसोटी शतके करणारे ५ फलंदाज
१. डॉन ब्रॅडमॅन (ऑस्ट्रेलिया) ६९ डाव
२. स्टीव स्मिथ* (ऑस्ट्रेलिया) १२१ डाव
३. सचिन तेंडुलकर (भारत) १३६ डाव
४. सुनील गावस्कर (भारत) १४४ डाव
५. मॅथ्यू हेडन  (ऑस्ट्रेलिया) १५५ डाव

त्याचबरोबर स्मिथने इंग्लंडविरोधात सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्यांच्या यादीत सचिन तेंडुलकरशी त्याने बरोबरी केली आहे.

विराटने शेअर केला फोटो, ट्रोर्ल्सनी म्हटले चलन कापल्यानंतर झाले हे हाल

एका संघाविरोधात सर्वाधिक कसोटी शतक करणाऱ्यांच्या यादीत आघाडीचे ५ फलंदाज

१. डॉन ब्रॅडमॅन (ऑस्ट्रेलिया) १९ शतक विरुद्ध इंग्लंड
२. सुनील गावस्कर (भारत) १३ शतक विरुद्ध वेस्ट इंडीज
३. जॅक हॉब्स (इंग्लंड) १२ शतक विरुद्ध ऑस्ट्रेलिया
४. सचिन तेंडुलकर/ स्टीव स्मिथ* ११ शतक विरुद्ध इंग्लंड

अ‍ॅशेस कसोटी मालिकेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत स्टिव स्मिथने आपल्याच देशाच्या स्टिव्ह वॉला मागे टाकले आहे. 

अ‍ॅशेस मालिकेत सर्वाधिक शतक ठोकणारे  आघाडीचे ५ फलंदाज

१. डॉन ब्रॅडमॅन  (ऑस्ट्रेलिया) १९ शतक
२. जॅक हॉब्स  (इंग्लंड) १२ शतक
३. स्टीव स्मिथ* (ऑस्ट्रेलिया) ११ शतक 
४. स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया) १० शतक
५. वॅली हेमंड/डेविड गॉवर (इंग्लंड) ०९ शतक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title::Ashes 2019 Old Trafford Test Steve Smith scores career 26th century and 3rd of ashes 2019 breaks Steve Waugh Record and equals Sachin Tendulkar reocrd