मराठी बातम्या  /  क्रीडा  /  स्टार फुटबॉलर रोनाल्डोवर बलात्काराचा खटला! आरोपांबाबत कोर्ट म्हणाले…

स्टार फुटबॉलर रोनाल्डोवर बलात्काराचा खटला! आरोपांबाबत कोर्ट म्हणाले…

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 12, 2022 09:29 PM IST

रोनाल्डोवर १२ वर्षांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता

ronaldo
ronaldo

जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला एका कायदेशीर प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. रोनाल्डोवर १२ वर्षांपूर्वी एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता, त्यानंतर हे प्रकरण बराच काळ न्यायालयात चालले. मात्र, आता या प्रकरणी अमेरिकेतील एका न्यायालयाने ख्रिस्तियानो रोनाल्डोची निर्दोष मुक्तता केली आहे.

ख्रिस्टियानो रोनाल्डने २००९ मध्ये लास वेगासमधील एका हॉटेलात आपल्यावर बलात्कार केला होता, असा आरोप कॅथरीन मायोर्गा या अमेरिकन मॉडलने केला होता. मात्र, तेव्हाही रोनाल्डोने हे आरोप फेटाळून लावले होते.

या आरोपांनंतर कॅथरीन मायोर्गाने रोनाल्डोकडून ३.७५ लाख अमेरिकन डॉलर्सची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. आता अमेरिकेतील एका न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल दिला असून, ४२ पानांच्या या निकालात कॅथरीन मायोर्गाच्या वकिलाने नियमांनुसार हा खटला लढला नसल्याचे म्हटले आहे.

तसेच, तक्रार दाखल करण्याची ही प्रक्रिया योग्य नाही. त्यामुळेच हे प्रकरण न्यायालयात पुढे नेणे शक्य नसल्याचे म्हणत न्यायालयाने हे प्रकरण रद्दबातल ठरवले आहे. "केवळ संशयाच्या आधारावर क्रिस्टियानो रोनाल्डोविरुद्ध अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही", असे २०१९ मध्येही कोर्टाने या प्रकरणी म्हटले होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग