मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, टी-20 मालिकेसाठी हसरंगावर मोठी जबाबदारी

Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, टी-20 मालिकेसाठी हसरंगावर मोठी जबाबदारी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 28, 2022 10:05 PM IST

India vs Sri Lanka, Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. दासून शनाका या दोन्ही मालिकेत संघाचा कर्णधार असेल.

india vs sri lanka
india vs sri lanka

Sri Lanka Team India Tour: नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकन क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. यासाठी बुधवारी (२८ डिसेंबर) श्रीलंका क्रिकेट बोर्डाने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. दासुन शनाकाची टी-20 आणि वनडेसाठी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी, अष्टपैलू वानिंदू हसरंगा याला T20I मालिकेसाठी श्रीलंकेचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तर कुसल मेंडिस वनडेत उपकर्णधार असेल. 

भारत-श्रीलंका टी-20 मालिका ३ जानेवारी २०२३ पासून सुरु होईल. दोन्ही संघांमध्ये तीन टी-२० सामने होणार आहेत. यानंतर १० ते १५ जानेवारी दरम्यान ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

श्रीलंकेचे आक्रमक फलंदाज भानुका राजपक्षे आणि नुवान तुषारा हे फक्त T20I मालिकेत खेळतील, तर नुवानिडू फर्नांडो आणि जेफ्री वँडरसे हे फक्त एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. कुसल मेंडिसची वनडे मालिकेसाठी उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 

टी२० मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निकांस्का, अविष्का फर्नांडो, सदीरा समराविकराम, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, चारिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा (उपकर्णधार), अशेन बंदारा, महिष दानका, महिष तिरस्का, चमुना, चमुना, चमुना मदुशांका, कसून रजिता, दुनिथ वेलागे, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ:

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निकांस्का, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रम, कुसल मेंडिस (व्हीसी), चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, अशेन बंदारा, महिष टेकशाना, चमिका करुणारत्ने, दिलशान मदन, राजकुमार, राजकुमार ड्युनिथ वेलेझ, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवानिडू फर्नांडो जेफ्री वँडरसे.

भारत-श्रीलंका टी-20 मालिका

पहिला टी-20 सामना- ३ जानेवारी (मुंबई)

दुसरा टी-20 सामना- ५ जानेवारी (पुणे)

तिसरा टी-20 सामना- ७ जानेवारी (राजकोट)

भारत-श्रीलंका वनडे मालिका

पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)

दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)

तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम)

WhatsApp channel