IPL Cricket Score, SRH vs RCB Indian Premier League 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. हैदराबादचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीने दोन गडी गमावून लक्ष्य गाठले.
आयपीएल 2023 च्या ६५व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. १८ मे (गुरुवार) रोजी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीला विजयासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकात पूर्ण केले. आरसीबीच्या विजयाचे हिरो विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस ठरले.
विराट कोहलीने ६३ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे सहावे शतक आहे. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.
डु प्लेसिसबद्दल बोलायचे झाले तर त्याने ४७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७१ धावा केल्या. डु प्लेसिसने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. डू प्लेसिस आणि कोहली यांनी मिळून १७.५ षटकांत १७२ धावांची तुफानी भागीदारी केली.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. त्यांनी आपॉवरप्लेमध्येच सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्मा (११) मायकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर महिपाल लोमररकरवी झेलबाद झाला. त्यानंतर एका चेंडूनंतर ब्रेसवेलने राहुल त्रिपाठीलाही आपला बळी बनवले. येथून एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन यांनी ७६ धावांची भागीदारी करत डाव सांभाळला. शाहबाज अहमदने मार्करामला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. मार्करामने २० चेंडूत १८ धावा केल्या.
मार्कराम बाद झाल्यानंतर हॅरी ब्रूक आणि क्लासेन यांच्यात ७४ धावांची भागीदारी झाली. मार्करामने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना १०४ धावांची धडाकेबाज खेळी खेळली. यादरम्यान क्लासेनने ५१ चेंडूंचा सामना केला आणि आठ चौकारांशिवाय सहा षटकार ठोकले. हॅरी ब्रूक २७ धावा करून नाबाद राहिला.
विराट कोहलीने ६२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. मात्र, शतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कोहलीने ६३ चेंडूत १०० धावांची खेळी केली. त्याने १२ चौकार आणि चार षटकार मारले. त्याचे आयपीएलमधील हे सहावे शतक आहे. आरसीबीची धावसंख्या १७० धावांच्या पुढे गेली असून हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
१८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबी संघाची सुरुवात चांगली झाली आहे. विराट कोहली आणि फाफ डुप्लेसिस वेगाने धावा करत आहेत. ६ षटकात दोघांनी ६४ धावा केल्या आहेत. विराट १९ चेंडूत २९ तर डुप्लेसिस १७ चेंडूत ३४ धावांवर खेळत आहे.
हेनरिक क्लासेनच्या शतकी खेळीमुळे सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना पाच विकेट्सवर १८६ धावा केल्या. हैदराबादकडून क्लासेन व्यतिरिक्त हारू ब्रूकने २७ धावा केल्या. आरसीबीकडून मायकेल ब्रेसवेलने दोन बळी घेतले. शाहबाज अहमद, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेनरिक क्लासेनने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि सहा षटकार मारले. मात्र, तो शतक झळकावून बाद झाला. हर्षल पटेलने त्याला क्लीन बोल्ड केले. क्लासेनने ५१ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. हैदराबादची धावसंख्या १९ षटकांत ४ बाद १८२ अशी आहे.
सनरायझर्स हैदराबादचे एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत. क्लासेन वेगाने धावा करत आहे. त्याचवेळी मार्कराम एका टोकाला सावधपणे खेळत आहे. सात षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ५६ धावा आहे.
२८ धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची दुसरी विकेट पडली. हैदराबादच्या दोन्ही सलामीवीरांना एकाच षटकात बाद करून मायकल ब्रेसवेलने आपल्या संघाला सामन्यात परत आणले आहे. राहुल त्रिपाठीने १२ चेंडूत १५ धावा केल्या. आता एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत.
सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट २७ धावांवर पडली. अभिषेक शर्मा १४ चेंडूत ११ धावा करून बाद झाला आहे. त्याला मायकल ब्रेसवेलने महिपाल लोमरकरवी झेलबाद केले. आता कर्णधार एडन मार्कराम राहुल त्रिपाठीसोबत क्रीजवर आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीचा संघ कोणताही बदल न करता हा सामना खेळणार आहे. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबाद संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने १२ पैकी सहा सामने जिंकले असून गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी आरसीबीला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. आरसीबीला पहिल्या पाचपैकी तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, नंतर या संघाने पुनरागमन केले आणि पुढील सातपैकी ४ सामने जिंकले. गेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानचा ११२ धावांनी पराभव केला. आता उर्वरित दोन सामने जिंकून प्लेऑफमधील आपले स्थान पक्के करण्याचा या संघाचा प्रयत्न असेल.