SRH Vs PBKS Highlights : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय, पंजाबला ८ विकेट्सनं हरवलं
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SRH Vs PBKS Highlights : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय, पंजाबला ८ विकेट्सनं हरवलं

SRH Vs PBKS Highlights : सनरायझर्स हैदराबादचा पहिला विजय, पंजाबला ८ विकेट्सनं हरवलं

Apr 09, 2023 06:50 PM IST

Srh Vs Pbks Score : आयपीएल 2023 चा १४ वा सामना आज (९ एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्याचा पंजाबचा ८ विकेट्सनी पराभव झाला. यंदाच्या आयपीएलमधील हैदराबादचा हा पहिलाच विजय आहे.

Srh Vs Pbks Live Score
Srh Vs Pbks Live Score

IPL Cricket Score, SRH vs PBKS Indian Premier League 2023 : आयपीएलच्या १४व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ८ विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना झाला. हैदराबादचा हा या मोसमातील पहिला विजय आहे. दुसरीकडे पंजाबला तीन सामन्यांत प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला आहे.

SRH Vs PBKS Score updates 

सनरायझर्सचा मोठा विजय

सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवत मोठा विजय मिळवला. हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पंजाबने २० षटकांत ९ गडी बाद १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स संघाने १७.१ षटकात २ बाद १४५ धावा करत सामना जिंकला.

सनरायझर्ससाठी राहुल त्रिपाठीने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ४८ चेंडूत ७४ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले. कर्णधार एडन मार्कराम २१ चेंडूत ३७ धावा करून नाबाद राहिला. त्याने सहा चौकार मारले. त्रिपाठी आणि मार्कराम यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मयंक अग्रवाल २० चेंडूत २१ धावा करून बाद झाला. हॅरी ब्रूकने १४ चेंडूत १३ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

SRH Vs PBKS Live Score : सनरायझर्सने १० षटकांत ६७/२ धावा केल्या

सनरायझर्स हैदराबादने १० षटकांत २ बाद ६७ धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी २४ चेंडूत ३१ आणि एडन मार्कराम दोन चेंडूत २ धावांवर खेळत आहे. मयंक अग्रवालच्या रूपाने संघाला दुसरा  धक्का बसला. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. मयंकला राहुल चहरने सॅम करणच्या हाती झेलबाद केले. त्याने २० चेंडूत २१ धावा केल्या.

SRH Vs PBKS Live Score : पंजाबने १४३ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर १४४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शिखर धवनच्या नाबाद ९९ धावांच्या जोरावर पंजाब संघाने नऊ गडी गमावून १४३ धावा केल्या. धवनशिवाय फक्त सॅम करनला दुहेरी आकडा गाठता आला. सॅम करनने २२ धावांची खेळी केली. हैदराबादकडून मयंक मार्कंडेने ४, उमरान मलिक आणि मार्को यानसेनने प्रत्येकी २ गडी बाद केले. भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली. या सामन्यात धवनचे शतक नक्कीच हुकले, पण त्याच्या नाबाद ९९ धावांमुळे त्याने पंजाब किंग्जला लढाऊ धावसंख्येपर्यंत पोहोचवले आहे.

SRH Vs PBKS Live Score : पंजाबला तिसरा धक्का

मार्को यानसेनने सनरायझर्स हैदराबादला तिसरा विकेट मिळवून दिला. चौथ्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने जितेश शर्माला बाद केले. नऊ चेंडूत चार धावा करून जितेश एडन मार्करामकरवी झेलबाद झाला.

SRH Vs PBKS Live Score : दोन्ही संघ

सनरायझर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम करन, नॅथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, अर्शदीप सिंग.

SRH Vs PBKS Live Score : पंजाब किंग्ज संघ प्रथम फलंदाजी करेल

सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करेल. दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन आणि फिरकीपटू मयंक मार्कंडे सनरायझर्सकडून पदार्पण करणार आहेत. त्याचबरोबर मॅथ्यू शॉर्ट पंजाब संघाकडून प्रथमच खेळणार आहे. भानुका राजपक्षेच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या