मराठी बातम्या  /  क्रीडा  /  SRH Vs LSG No Ball Controversy : नो बॉलवरून राडा, कोहलीचं नाव घेत प्रेक्षकांचा गौतम गंभीरच्या डगआऊटवर हल्ला

SRH Vs LSG No Ball Controversy : नो बॉलवरून राडा, कोहलीचं नाव घेत प्रेक्षकांचा गौतम गंभीरच्या डगआऊटवर हल्ला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 13, 2023 06:53 PM IST

SRH Vs LSG IPL 2023 no ball Controversy : हैदराबाद-लखनौ सामन्यात एक विचित्र घटना घडली. प्रेक्षक गॅलरीतून चाहत्यांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या डग आऊटवर पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला केला.

SRH Vs LSG IPL 2023
SRH Vs LSG IPL 2023

IPL 2023 च्या ५८व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सामना लखनौ सुपरजायंट्सशी (lsg) होत आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आहे. या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी २० षटकांत ६ गडी बाद १८२ धावा केल्या. सध्या लखनौची फलंदाजी सुरू आहे.

दरम्यान, या सामन्यात एक विचित्र घटना घडली. प्रेक्षक गॅलरीतून चाहत्यांनी लखनऊ सुपर जायंट्सच्या डग आऊटवर पाण्याच्या बाटल्यांनी हल्ला केला.

वास्तविक, सामन्याच्या १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर हा सर्व वाद सुरू झाला. आवेश नखाच्या फुल टॉस बॉलवर अब्दुल समदने एक धाव घेतली. फलंदाजासाठी तो धोकादायक चेंडू होता. अंपायरने हा नो-बॉल घोषित केला. यानंतर लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने या नो-बॉलच्या निर्णयाविरोधात रिव्ह्यू घेतला. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचाचा निर्णय बदलला. थर्ड अंपायरने हा लीगल बॉल असल्याचे सांगितले. यावर अब्दुल समद नाखूश झाला. याबाबत त्याने लेग अंपायरकडे तक्रार केली.

यानंतर प्रेक्षकांनी कोहलीच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी पाण्याच्या बॉटल आणि इतर वस्तू लखनौच्या डगआऊटच्या दिशेने फेकल्या. यानंतर मैदानावरील पंच लखनऊ डगआऊटजवळ पोहोचले आणि सपोर्ट स्टाफशी बोलत असल्याचे दिसून आले. सनरायझर्स हैदराबादचे फिरकी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन यांच्याशी ते बोलले. यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये अंपायर मुरलीधरनला नट बोल्ट दाखवत आहेत.

SRH Vs LSG No Ball Controversy
SRH Vs LSG No Ball Controversy

प्रेक्षक गंभीरला चिडवत होते

दुसरीकडे याच घटनेशी संबंधित आणखी काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सनरायझर्सचे चाहते लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरला चिडवत असल्याचे दिसत आहे. विराट कोहलीचे नाव घेऊन ते गंभीरला चिडवताना दिसत आहेत. यानंतर गंभीरही चिडलेला दिसला.

सनरायझर्स हैदराबादही ट्रोल

यानंतर या नो-बॉलवरून चाहत्यांनी सोशल मीडियावर सनरायझर्स हैदराबादची खिल्ली उडवली. काहींनी लिहिले की, ‘प्रत्येक वेळी नो-बॉल मिळत नाही.’ खरे तर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हैदराबादला संदीप शर्माच्या शेवटच्या चेंडूवर नो-बॉल मिळाला. त्यावेळी अब्दुल समदने संधीचा फायदा घेत षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

WhatsApp channel