मराठी बातम्या  /  Sports  /  Srh Vs Lsg Abhishek Sharma Over Five Sixes Lucknow Supergiants Win Match By 7 Wickets

SRH vs LSG IPL : अभिषेक शर्मावर गगनचुंबी षटकारांचा मारा, पुरन-स्टोइनीसनं ठोकल्या ६ चेंडूत ३१ धावा

Stoinis and Pooran vs Abhishek Sharma
Stoinis and Pooran vs Abhishek Sharma
Rohit Bibhishan Jetnavare • HT Marathi
May 13, 2023 08:31 PM IST

Stoinis and Pooran hits 5 sixes in Abhishek Sharma over : मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी अभिषेक शर्माच्या एका षटकात पाच षटकार ठोकून ३१ धावा केल्या. आयपीएल 2023 मध्ये एका षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा झाल्याची ही तिसरी वेळ आहे.

Stoinis and Pooran scored 31 runs in Abhishek Sharma over : इंडियन प्रीमियर लीगच्या ५८व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा ७ गडी राखून पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर १३ मे (शनिवार) रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने लखनौ सुपरजायंट्सला १८३ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गाठले.

ट्रेंडिंग न्यूज

लखनौच्या विजयात कॅरेबियन फलंदाज निकोलस पूरनने महत्त्वाची भूमिका बजावली. पुरणने केवळ १३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४४ धावा ठोकल्या. प्रेरक मंकडनेही ४५ चेंडूत ६४ धावांची शानदार खेळी केली. मंकडने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले. याशिवाय स्टॉइनिसने ४० आणि क्विंटन डिकॉकने २९ धावांचे योगदान दिले.

पुरन-स्टोइनिसने एका षटकात कुटल्या ३१ धावा

दरम्यान, या सामन्याचा टर्निंग पॉइंट अभिषेक शर्माचे षटक (१६वे) ठरले. या षटकात मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन यांनी एकूण ५ गगनचुंबी षटकार ठोकले. याच षटकाने सामना पूर्णपणे लखनौच्या बाजूने वळवला. पूरन आणि स्टॉइनिस यांनी या षटकात ३१ धावा ठोकल्या. आयपीएल 2023 मध्ये एका षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा निघण्याची ही तिसरी वेळ आहे.

वास्तविक, लखनौच्या डावाच्या १६व्या षटकात स्टॉइनिसने पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. यांना अभिषेकने दुसरा चेंडू वाईड टाकला. दुसऱ्या लीगल चेंडूवर स्टॉइनिसने पुन्हा चेंडू हवेत पाठवला. मात्र, ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर अभिषेकने स्टॉइनिसचा डाव संपवला. स्टॉइनिस बाद झाल्यानंतर क्रीजवर उतरलेला निकोलस पूरन ड्रेसिंग रूममधून सेट होऊन मैदानावर उतरला होता.

पूरनने पहिल्याच चेंडूवर १०५ मीटर लांब षटकार ठोकला. त्याचवेळी, षटकातील पाचवा आणि नंतर शेवटचा चेंडूही सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यात निकोलस पूरन यशस्वी ठरला. अशाप्रकारे, अभिषेकच्या षटकात एकूण ५ षटकार लागले आणि स्टोइनिस आणि पूरनने ३१ धावा केल्या. अभिषेकच्या या षटकाने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलले.

तिसऱ्यांदा एका ओव्हरमध्ये ३१ धावा

आयपीएल 2023 मध्ये एका षटकात ३१ धावा झाल्याची ही तिसरी वेळ आहे. केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगने गुजरात टायटन्सविरुद्ध एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारत ३१ धावा केल्या होत्या. त्याचवेळी मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरच्या षटकात पंजाबविरुद्ध ३१ धावा झाल्या होत्या.

संबंधित बातम्या