David Warner & Bhuvneshwar Kumar Viral Video : आयपीएल 2023च्या ३४व्या सामन्यात आज (२४ एप्रिल) सनरायझर्स हैदराबादचा (SRH) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने हैदराबादसमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
दरम्यान,या सामन्याआधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर सनरायझर्स हैदराबादचा (warner touch feet of bhuvneshwar kumar) खेळाडू भुवनेश्वर कुमारच्या पायाला स्पर्श करताना दिसत आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांच्याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू इशांत शर्मा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. डेव्हिड वॉर्नरने जेव्हा भुवनेश्वर कुमारला पाहिले तेव्हा तो त्याच्याकडे धावत गेला... आणि त्याच्या पाया पडला. यानंतर दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली. तसेच, दोन्ही दिग्गज बराच वेळ एकमेकांशी बोलत होते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ९ गडी गमावून १४४ धावा केल्या. या सामन्यात दिल्ली संघ अनेक बदलांसह उतरला. पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. मात्र, त्याच्या जागी संघात घेतलेल्या खेळाडूंनाही फार काही करता आले नाही. दिल्लीकडून मनीष पांडे आणि अक्षर पटेलने सर्वाधिक प्रत्येकी ३४ धावा केल्या.
तर हैदराबादच्या गोलंदाजांची चमकदार कामगिरी. भुवनेश्वरने चार षटकांत ११ धावा देत दोन बळी घेतले. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत २८ धावा देत तीन बळी घेतले. टी नटराजनने तीन षटकांत २१ धावा देत मिचेल मार्शची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.