WATCH : रबाडाच्या गोलंदाजीवर मार्करमचा चाबूक शॉट, काव्या मारनची रिअ‍ॅक्शन चर्चेत
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  WATCH : रबाडाच्या गोलंदाजीवर मार्करमचा चाबूक शॉट, काव्या मारनची रिअ‍ॅक्शन चर्चेत

WATCH : रबाडाच्या गोलंदाजीवर मार्करमचा चाबूक शॉट, काव्या मारनची रिअ‍ॅक्शन चर्चेत

Jan 18, 2023 12:04 PM IST

kavya maran reaction on Aiden Markram shot : दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमध्ये सनरायझर्स इस्टर्न केपने पहिला विजय मिळवला आहे. या विजयात संघाचा कर्णधार एडन मार्करमचा मोठा वाटा होता. त्याने अर्धशतक झळकावले. या दरम्यान त्याच्या एका शॉटचीही प्रचंड चर्चा होत आहे. त्याने मारलेल्या चौकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

kavya maran reaction markarm shot
kavya maran reaction markarm shot

SA T20, Sunrisers Eastern Cape vs MI Cape Town : सध्या दक्षिण आफ्रिका 20 लीगचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने MI केपटाऊनचा पराभव केला आहे. सनरायझर्सचा हा पहिलाच विजय आहे. या सामन्यात सनरायझर्सचा कर्णधार एडन मार्करमने शानदार फलंदाजी केली. मार्करमने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. त्याने ७ चौकार मारले. पण यामध्ये त्याच्या एका शॉटची प्रचंड चर्चा होत आहे.

१०व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करत होता. या षटकात मार्करमच्या बॅटमधून एक खणखणीत शॉट बाहेर आला. हा शॉट एखाद्या थप्पडापेक्षा कमी नव्हता. रबाडाने चौथ्या षटकातील तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला, मार्करम जणू या चेंडूसाठी आधीपासूनच तयार होता. एका गुडघ्यावर टेकून कव्हर्सवर त्याने चाबूक फटका मारला. चेंडू एक बाऊंस चौकार गेला. चौकार मिळाल्यानंतर सनरायझर्सची मालकीण काव्या मारनची रिअॅक्शन ही पाहण्यासारखे होती.

सामन्यात काय घडलं?

तत्पूर्वी, पोर्ट एलिझाबेथमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात सनरायझर्स इस्टर्न केपने नाणेफेक जिंकून एमआय केपटाऊनला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जॉर्ज लिंडेच्या २८ चेंडूंच्या ६३ धावांच्या जोरावर एमआयने ८ विकेट्स गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्सची सुरुवात चांगली झाली नाही कारण अवघ्या ९ धावांत त्यांनी २ गडी गमावले होते. यानंतर आलेल्या कर्णधार एडन मार्करमने सरेल इर्वीसोबत चांगली भागीदारी केली.

एडन मार्करामशिवाय आयर्विन ४१ धावा केल्या. तर शेवटी युवा फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने अवघ्या १८ चेंडूत ३० धावा ठोकल्या आणि आपल्या संघाला स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांमध्ये सनरायझर्सला पराभव स्वीकारावा लागला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या