मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sourav Ganguly 50th Birthday: दादाची प्री-बर्थडे पार्टी, सचिन-अंजलीची उपस्थिती
saurav ganguly
saurav ganguly

Sourav Ganguly 50th Birthday: दादाची प्री-बर्थडे पार्टी, सचिन-अंजलीची उपस्थिती

07 July 2022, 21:03 ISTRohit Bibhishan Jetnavare

सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या देखील यावेळी उपस्थित होत्या. सौरव आणि डोना यांचा विवाह २१ फेब्रुवारी १९९७ रोजी झाला होता.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली ८ जुलै (शुक्रवार) रोजी ५० वर्षांचा होणार आहे. मात्र, बर्थडेच्या आधीच गांगुलीचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. प्री-बर्थडे पार्टीत गांगुलीने केक कापला, यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह, आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला, महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्याह अनेक जण उपस्थित होते.

ट्रेंडिंग न्यूज

राजीव शुक्ला यांनी गुरुवारी ट्विटरवर गांगुली, जय शाह आणि सचिन तेंडुलकर यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये शुक्ला यांनी लिहिले की, "सौरव गांगुलीचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याला पुढील सुखी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा."

दरम्यान, या पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुरुवातीच्या दिवसांपासूनच गांगुली आणि सचिनमध्ये खूप चांगली मैत्री आहे, ती यावेळीही दिसून आली. या दोघांशिवाय फोटोत राजीव शुक्ला आणि जय शाह यांच्यासोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत.

सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या देखील यावेळी उपस्थित होत्या. सौरव आणि डोना यांचा विवाह २१ फेब्रुवारी १९९७ रोजी झाला होता. तर सचिनने २५ मे १९९५ रोजी अंजलीसोबत लग्न केले होते.

गांगुली सध्या परिवारासह इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघही तिथेच आहे. एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गांगुली आणि तेंडुलकर या दोघांच्याही इंग्लंडमधील खूप आठवणी आहेत. दोघांनीही इंग्लंडच्या भूमीवर भरपूर सामने खेळले आहेत. तसेच, दोघांनी तिथे कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये भरपूर धावाही केल्या आहेत. सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. त्या संघात सचिन, गांगुली हे देखील होते.