मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : एक इनिंग ५ रेकॉर्ड, शुभमनने एकाच डावात गेल-वॉटसनसह ५ फलंदाजांचे हे विक्रम मोडले, पाहा

Shubman Gill : एक इनिंग ५ रेकॉर्ड, शुभमनने एकाच डावात गेल-वॉटसनसह ५ फलंदाजांचे हे विक्रम मोडले, पाहा

May 26, 2023 11:03 PM IST

gt vs mi qualifier 2 shubman gill century : शुभमन गिलने मुंबईविरुद्ध क्वालिफायर-2 सामन्यात शतक झळकावले आहे. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

gt vs mi qualifier 2 shubman gill century
gt vs mi qualifier 2 shubman gill century

IPL 2023 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये शुभमन गिलने शानदार शतक ठोकले. या मोसमात त्याने तिसऱ्यांदा शतक झळकावले. यासोबतच त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. गिलने ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यातील हे संयुक्तपणे जलद शतक ठरले.

गिलच्या आधी ऋद्धिमान साहाने आयपीएल २०१४ च्या अंतिम सामन्यात आणि रजत पाटीदारने गेल्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात ४९ चेंडूत शतक पूर्ण केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

प्लेऑफमध्ये शतक झळकावणारा गिल हा सातवा फलंदाज आहे. तर अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याने २३ वर्षे २६० दिवस वय असताना आयपीएल प्लेऑफ सामन्यात शतक झळकावले आहे.

गेल आणि वॉटसनला मागे टाकलं

गिलचे आयपीएल 2023 मधील हे तिसरे शतक आहे. एका मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत गिल तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहलीने २०१६ मध्ये प्रत्येकी ४ आणि जोस बटलरने २०२२ च्या IPL मध्ये ४ शतके झळकावली होती. गिलने या बाबतीत शेन वॉटसन आणि ख्रिस गेलसारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे. ख्रिस गेल, हाशिम आमला, शेन वॉटसन, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी एका मोसमात दोन शतके झळकावली आहेत. तर विराट कोहलीनेही या मोसमात सलग दोन शतके झळकावली आहेत.

एका मोसमात ८०० हून अधिक धावा करणारा चौथा फलंदाज

IPL च्या एका मोसमात ८०० हून अधिक धावा करणारा शुभमन गिल हा चौथा फलंदाज ठरला आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्यात विराट कोहली आघाडीवर आहे. कोहलीने IPL २०१६ मध्ये ४ शतके झळकावत ९७३ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, जोस बटलरने गेल्या मोसमात ४ शतकांच्या मदतीने ८६३ धावा केल्या होत्या. डेव्हिड वॉर्नरनेही २०१६ मध्ये ८४८ धावा केल्या होत्या.

प्लेऑफमध्ये सर्वात मोठी इनिंग

शुभमन गिलने या सामन्यात ६० चेंडूत १२९ धावा केल्या. आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यातील ही सर्वात मोठी इनिंग (सर्वोच्च धावसंख्या) आहे. यापूर्वी प्लेऑफमधील सर्वात मोठी खेळी वीरेंद्र सेहवागने खेळली होती. सेहवागने आयपीएल २०१४ मध्ये चेन्नईविरुद्ध पंजाबकडून १२२ धावा केल्या होत्या. गिलच्या शानदार खेळीमुळे गुजरातच्या संघाला तीन गड्यांच्या मोबदल्यात २३३ धावा करता आल्या. गुजरात संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

त्याचबरोबर मुंबईविरुद्धची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. गिलने या डावात १० षटकार मारले. या सोबतच गिल हा प्लेऑफ सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम ऋद्धिमान साहाच्या नावावर होता, साहाने २०१४ च्या आयपीएलच्या फायनलमध्ये कोलकाताविरुद्ध ८ षटकार ठोकले होते.

WhatsApp channel