मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill century : शुभमन गिलचं वादळी शतक, नरेंद्र मोदी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस

Shubman Gill century : शुभमन गिलचं वादळी शतक, नरेंद्र मोदी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 26, 2023 09:16 PM IST

Shubman Gill century Vs MI Qualifier 2 : मुंबईविरुद्धच्या क्वालिफायर -2 सामन्यात गुजरातच्या शुभमन गिलने शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ४९ चेंडूत शतक पूर्ण केले.

Shubman Gill century vs MI
Shubman Gill century vs MI

Shubman Gill century highlightsVS MI Qualifier 2 : आयपीएल 2023 चा दुसरा क्वालिफायर आज शुक्रवारी (२६ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर  खेळला जात आहे. या सामन्यात गुजराच्या शुभमन गिलने वादळी शतक झळकावले (shubman gill vs mumbai indians century) आहे. त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत आतार्यंत १० षटकार आणि ५ चौकार मारले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

शुभमन गिलचे हे आयपीएलच्या चालू हंगामातील तिसरे शतक आहे. त्याने ४९ चेंडूत १०० धावा पूर्ण केल्या आहेत. गिलने या मोसमाच्या सुरुवातीला साखळी फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शतके झळकावली होती.

आयपीएल एका हंगामातील सर्वाधिक शतके

४ शतकं- विराट कोहली (RCB, २०१६)

४ शतकं - जोस बटलर (RR, २०२२)

३ शतकं - शुभमन गिल (GT, २०२३)

हे वृत्त लिहिपर्यंत गुजरात टायटन्सच्या १५ षटकात १ बाद १६६ धावा झाल्या आहेत. शुभमन गिल ५३ चेंडूत ११७ तर साई सुदर्शन २१ चेंडूत २७ धावांवर खेळत आहे. गुजरात मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पुढे जात आहे. गिल आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत ११२ धावांची भागीदारी केली आहे.

तत्पूर्वी, या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे टॉसला ४५ मिनिटे उशीर झाला. 

दोन्ही संघ

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुधारसन, विजय शंकर, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल

WhatsApp channel