मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : दिल दिल शुभमन गिल! वीरू-युवीपासून ते जाफरपर्यंत... द्विशतकावर प्रतिक्रिया, पाहा

Shubman Gill : दिल दिल शुभमन गिल! वीरू-युवीपासून ते जाफरपर्यंत... द्विशतकावर प्रतिक्रिया, पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 18, 2023 07:55 PM IST

Shubman Gill Double Century : शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध २०८ धावा केल्या. गिलच्या द्विशतकानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंनी या युवा फलंदाजाचे जोरदार कौतुक केले आहे.

Shubman Gill Double Century
Shubman Gill Double Century

शुभमन गिलने बुधवारी (१८जानेवारी) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर इतिहास रचला. गिलने किवी गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत २०८ धावा ठोकल्या. शुभमनने आंतरराष्ट्रीय करिअरमधले पहिले द्विशतक झळकावले. यासोबतच तो द्विशतक झळकावणार सर्वात तरुण खेळाडूदेखील ठरला आहे. गिलच्या द्विशतकानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गिलने सुरुवात सावधपणे केली आणि रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये रोहितच्या ३४ धावा होत्या. यानंतर भारताने रोहितसह विराट कोहली आणि इशान किशनच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या, पण गिलने एक बाजू लावून धरली. गिलने पहिल्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला.

गिलला ५० ते १०० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ३५ चेंडू लागले. तेच शतक ते दीडशे धावांपर्यंत पोहोचायला त्याने तेवढेच चेंडू घेतले. त्यानंतर तो अवघ्या २३ चेंडूत १५० ते २०० धावांपर्यंत पोहोचला. गिलने डावाच्या ४९व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या पहिल्या ३ चेंडूंवर षटकार मारून द्विशतक पूर्ण केले.

शुभमन गिलची खेळी

० ते ५० धावा - ५२ चेंडू

५१ ते १०० धावा - ३५ चेंडू

१०० ते १५० धावा- ३५ चेंडू

१५१ ते २०० धावा - २३ चेंडू

गिलच्या द्विशतकानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. युवराज सिंग, आर अश्विन आणि वीरेंद्र सेहवागसारख्या भारतीय खेळाडूंनी या युवा फलंदाजाचे कौतुक केले आहे.

युवराज सिंगने ट्विट म्हटले की, वनडे सामन्यात २०० धावा. इतक्या लहान वयात अविश्वसनीय. माझ्यासाठी आणि शुभमनच्या वडिलांसाठी हा खूप अभिमानाचा दिवस आहे. अभिनंदन शुभमन, संपूर्ण देशाला तुझा अभिमान आहे.

तर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विट केले की, 'वाह शुभमन. द्विशतक अद्भूत.'

यानंतर वसीम जाफरने लिहिले की, 'दिल दिल शुभमन गिल.'

 

WhatsApp channel