Ind Vs NZ ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने काही स्टायलिश शॉट्स मारले. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी शुभमन गिल आणि शिखर धवन मैदानात उतरले .
शुभमन गिलने अर्धशतकी खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार विकेटच्या मागे अप्पर कटने मारला. त्याचा हा स्टायलिश शॉट पाहून न्यूझीलंडचे खेळाडुही आश्चर्यचकीत झाले. शुभमन गिलने ६५ चेंडूत ५० धावा केल्या. यात त्याने १ चौकार आणि तीन षटकार लगावले. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर कॉनवेने त्याचा झेल टिपला.
गिलने हा षटकार मॅट हेन्रीने टाकलेल्या दहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लगावला. गिलने इथं फक्त हेन्रीच्या वेगाचा आणि मैदानाच्या जवळ असलेल्या सीमेचा फायदा घेतल षटकार मारला. ऑकलंडचे मैदान हे साइड बाउंड्रीच्या तुलनेत पुढे आणि मागे लहान आहे. गिलने याच बाजुला षटकार मारला. याआधी त्याने सहाव्या षटकात हेन्रीच्याच गोलंदाजीवर लॉग ऑनला षटकार मारला होता.