मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shubman Gill : सामना सुरू व्हायच्या आधी शुभमन गिल नेहमी ईशान किशनला शिव्या का घालतो?

Shubman Gill : सामना सुरू व्हायच्या आधी शुभमन गिल नेहमी ईशान किशनला शिव्या का घालतो?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 19, 2023 11:24 AM IST

Shubman Gill Pre Match Routine : द्विशतकवीर शुभमन गिल याचा दिनक्रम नेमका कसा असतो? तो ईशान किशानला रोज शिव्या का देतो?, याचा खुलासा त्यानं केला आहे.

Shubman Gill - Rohit Sharma - Ishan Kishan
Shubman Gill - Rohit Sharma - Ishan Kishan

Shubman Gill - Rohit Sharma - Ishan Kishan : न्यूझीलंड विरुद्ध बुधवारी हैदराबाद इथं झालेल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल यानं तमाम क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या शुभमन गिल याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचवेळी ड्रेसिंग रूममधील त्याच्याबद्दलचे किस्सेही सध्या सर्वत्र चर्चिले जात आहेत. शुभमन आणि ईशान किशन यांच्यातील असाच एक किस्सा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.

हैदराबाद येथील सामन्यानंतर भारताचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा यांच्याशी बोलताना शुभमननं हा किस्सा सांगितला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात रोहित व शुभमन यांच्यासह ईशान किशनही दिसत आहेत. विशेष म्हणजे, हे तीनही फलंदाज द्विशतकवीर आहेत.

ही चर्चा सुरू करताना रोहित शर्मा व ईशान किशन यांनी आधी शुभमनचं २०० प्लस क्लबमध्ये स्वागत केलं. नंतर रोहितनं शुभमनला त्याच्या खेळीबद्दल व सामन्याआधीच्या रूटीनबद्दल प्रश्न विचारले. तेव्हा शुभमननं एक मोठा खुलासा केला. सामन्याच्या आधी मी ईशान किशनला यथेच्छ शिव्या हासडतो. ही शिवीगाळ माझ्या रूटिनचा भाग झाली आहे,' असं तो म्हणाला. त्याचं कारणही त्यानं सांगितलं.

'हा माणूस माझा सगळा दिनक्रम बिघडवून टाकतो. तो मला सुखानं झोपू देत नाही. आयपॅड सुरू असता हा इअरपॉड घालण्याची नाही. मोठमोठ्या आवाजात सिनेमे लावून बसतो. त्यामुळं माझ्या झोपेचं खोबरं होतो आणि मी याला शिव्या घालतो. आवाज कमी कर किंवा इअरपॉड घाल असं याला सांगितलं की उलट तो मलाच सुनावतो. तू माझ्या रूममध्ये झोपतोस. त्यामुळं इथं माझी मर्जी चालेल असं म्हणतो. त्यामुळं आमचं भांडण ठरलेलं असतं. हाच माझा दिनक्रम आहे, असं शुभमन गिल हसत हसत म्हणाला.

कसा झाला सामना?

शुभमन गिलच्या जोरदार खेळीमुळं भारतानं न्यूझीलंडपुढं ३५० धावांचा डोंगर रचला. इतकं मोठं आव्हान असूनही न्यूझीलंडनं निकराची लढत देत ३३७ धावा केल्या. मात्र, विजयासाठी त्यांना १३ धावा कमी पडल्या. न्यूझीलंडकडून ब्रेसवेलनं १४० धावांची धडाकेबाज खेळी केली.

WhatsApp channel