चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल 2023 चा विजेता ठरला. या संघाने अंतिम सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले. २८ मे रोजी होणारा अंतिम सामना पावसामुळे २९ मे रोजी (रिझर्व्ह डे) खेळला गेला. या दिवशीही पाऊस पडला, त्यामुळे चेन्नईने डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईसमोर विजयासाठी १५ षटकात १७१ धावांचे लक्ष्य देण्याते आले. यानंतर सीएसकेने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.
सीएसकेच्या विजेतेपदात शिवम दुबेचा मोठा वाटा आहे. शिवमने १६ सामन्यांच्या १४ डावांमध्ये ४१८ धावा केल्या, या मोसमात CSK च्या अनेक विजयांमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने या धावा १५८.३३ च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने केल्या आहेत. षटकार मारण्याच्या बाबतीत, तो आरसीबीच्या फाफ डुप्लेसी (३६ षटकार) नंतर दुसऱ्या स्थानावर आहे. शिवमने या हंगामात ३५ षटकार ठोकले.
दरम्यान, शिवमने एका मुलाखतीत धोनीबाबत एक खुलासा केला आहे. तो म्हणाला, 'धोनी पुढच्या हंगामात खेळेल की नाही हे मला माहीत नाही, पण आम्हाला त्याची गरज आहे जेणेकरून आम्ही स्वतःला आणखी चांगले बनवू शकू. माही भाईने मला विचारांची स्पष्टता दिली आहे.
खरं तर, अंतिम सामन्यानंतर धोनीने देखील सांगितले आहे की, तो आयपीएल 2023 नंतर निवृत्त होणार नाही आणि पुढील हंगामातही फिटनेसने साथ दिली तर खेळताना दिसेल.
या सोबतच, दुबे पुढे म्हणाला की, धोनीने मला संघातील माझी भुमिका स्पष्ट सांगितली होती. संघाची धावगती वाढवणे हे आपले काम होते असे दुबे म्हणाला". मी लवकर आऊट झालो तरी हरकत नाही, पण दिलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कर, हा धोनीचा दुबेला स्पष्ट संदेश होता.