मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shardul Thakur Wedding : मानलं रे ठाकूर... लॉर्ड शार्दुलचा हळदीत झिंगाटवर डान्स, व्हिडीओ बघितला का?

Shardul Thakur Wedding : मानलं रे ठाकूर... लॉर्ड शार्दुलचा हळदीत झिंगाटवर डान्स, व्हिडीओ बघितला का?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 26, 2023 11:16 AM IST

shardul thakur haldi ceremony : के एल राहुल आणि अक्षर पटेलनंतर आता लॉर्ड शार्दूल देखील मिताली पारूळकरसोबत सात फेरे घेणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी हे कपल लग्न करणार आहे. त्यापूर्वी मुंबईत शार्दुलचा हळदी (shardul thakur haldi dance video) समारंभ पार पडला. यात त्याने जबरदस्त डान्स केला आहे.

Shardul Thakur Wedding
Shardul Thakur Wedding

shardul thakur haldi dance video : टीम इंडियामध्ये सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. स्टार फलंदाज केएल राहुलने बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले. यानंतर अष्टपैलू अक्षर पटेलने त्याची मैत्रिण मेहा पटेलसोबत लग्न केले. आता शार्दुल ठाकुरही लग्नाच्या तयारीत आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मिताली पारुळकरशी त्याचे लग्न होणार आहे.

लॉर्ड शार्दुल या नावाने प्रसिद्ध असलेला शार्दुल ठाकूर २७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकणार आहे. शार्दुल त्याची मैत्रिण मिताली पारुलकरसोबत लग्न करणार आहे.

शार्दूलचा हळदीतील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मात्र त्यापूर्वी शार्दूला ठाकूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शार्दुलच्या हळदीच्या कार्यक्रमाचा आहे. मुंबईमध्ये शार्दुलचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमात शार्दूल त्याचे कुटुंब आणि मित्रमंडळींच्या सोबत झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसला. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

शार्दुल आणि मिताली हे चांगले मित्र आहेत आणि दोघांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये एंगेजमेंट केली होती. त्याच्या एंगेजमेंटमध्येही शार्दुलने जबरदस्त डान्स केला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलही झाला होता.

शार्दुलचे क्रिकेट करिअर

शार्दुलने ऑगस्ट २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियासाठी एकूण ८ कसोटी, ३४ एकदिवसीय आणि २५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. शार्दुलने बॉल आणि बॅट दोन्हीत संघासाठी चांगले योगदान दिले आहे.

कसोटीत त्याने गोलंदाजीत २७ बळी घेतले आहेत आणि फलंदाजीत २५४ धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण ५० विकेट घेतल्या असून फलंदाजीत २९८ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर शार्दुलला टी-20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंत ३३ बळी मिळाले असून त्याने बॅटिंगमध्ये ६९ धावा केल्या आहेत.

WhatsApp channel