मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shami-Hasin Jahan : लव्ह, लग्न आणि १० लाखांची पोटगी... शमी आणि हसीन जहाँचा नेमका वाद काय? जाणून घ्या
Shami-Hasin Jahan court case
Shami-Hasin Jahan court case

Shami-Hasin Jahan : लव्ह, लग्न आणि १० लाखांची पोटगी... शमी आणि हसीन जहाँचा नेमका वाद काय? जाणून घ्या

24 January 2023, 16:01 ISTRohit Bibhishan Jetnavare

Mohammed Shami Hasin Jahan : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील प्रेमकहाणी १२ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. त्यांनी लग्नही केले होते. मात्र, हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही. २०१८ मध्ये दोघांच्या संसाराला नजर लागली. आता हसीन जहाँ आणि शमी यांच्यात कोर्टात वाद सुरू आहे.

Shami-Hasin Jahan court case : भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यात न्यायालयात खटला सुरू आहे. हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप लावले होते. त्यानंतर हसीन जहाँने कोर्टात पोटगीसाठी केस दाखल केली होती. ही केस हसीन जहाँने जिंकलीदेखील, पण तिला अपेक्षेप्रमाणे पोटगी मिळू शकली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

वास्तविक, अलीपूर न्यायालयाच्या न्यायाधीश अनिंदिता गांगुली यांनी सोमवारी (२३ जानेवारी) निर्णय देताना सांगितले की, शमी दर महिन्याला हसीन जहाँला १ लाख ३० हजार रुपये पोटगी देईल. यामध्ये मुलीवर ८० हजार रुपये, तर हसीन जहाँला ५० हजार रुपये दिले मिळतील.

हसीन जहाँ आणि शमी २०११ मध्ये भेटले

शमी आणि हसीन जहाँ यांचा प्रेमविवाह झाला होता. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये कटुता केव्हा आणि कशी सुरू झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे. वास्तविक, हसीन जहाँ आयपीएलमध्ये एक मॉडेल आणि चीअरलीडर होती. शमी आणि हसीन जहाँ यांची २०११ मध्ये भेट झाली. त्यावेळी हसीन जहाँ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाची चीअरलीडर होती.

२०१४ मध्ये लग्न

येथूनच शमी आणि हसीन जहाँ यांच्यातील प्रेमकहाणी सुरू झाली आणि २०१४ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर हसीन जहाँने मॉडेलिंग आणि प्रोफेशन लाईफ सोडली. त्यानंतर २०१८ मध्ये दोघांमध्ये काही कारणांनी कटुता निर्माण झाली. यानंतर हसीन जहाँने शमीवर मारहाण, घरगुती हिंसाचार, मानसिक छळ आणि मॅच फिक्सिंगसह अनेक गंभीर आरोप केले. यानंतर दोघेही वेगळे राहू लागले आणि कोर्टात केस सुरू झाली.

२०१८ मध्ये, हसीन जहाँने पुन्हा तिच्या प्रोफेशनल लाईफमध्ये पाऊल ठेवले. हसीन जहाँने १० लाखांच्या पोटगीसाठी कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये ७ लाख रुपये तिची वैयक्तिक पोटगी आणि ३ लाख रुपये त्यांच्या मुलीच्या देखभालीसाठी मिळावेत, अशी तिची मागणी होती. 

यावर शमीचे वकील सेलीम रहमान यांनी दावा केला की, हसीन जहाँ स्वतः लाखो रुपये कमवत आहे. ती स्वतः एक प्रोफेशनल फॅशन मॉडेल आहे. अशा परिस्थितीत तिटी पोटगी तेवढी होत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालयाने दरमहा १.३० लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय घेतला. आता हसीन जहाँ उच्च न्यायालयात अपील करू शकते.