Shakib Al Hasan Loses Temper Again: बांगलादेश प्रीमिअर लीगच्या नवव्या हंगामाला सुरुवात झालीय. या हंगामातील सातवा सामना खेळण्यासाठी फॉर्च्यून बरिशाल आणि रंगपूर रायडर्स आमनेसामने आले.. या सामन्यात बांगलादेशचा ऑलराऊंडर शकीब अल हसन पुन्हा एकदा पंचाशी वाद घालताना दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. महत्त्वाचं म्हणजे, शाकीबची पंचाशी वाद घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही तो पंचासोबत हुज्जत घालताना दिसलाय.
शाकीब बरीशाल संघाचा कर्णधार आहे. या सामन्यात रंगपूर रायडर्सनं प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फॉर्च्यून बरिशालकडून अनामुल हक आणि डी सिल्वा सलामीला आले. परंतु, स्ट्राईक कोण घेणार? यावरून त्यांच्यात गोंधळ उडला. रंगपूर रायडर्सनं पहिला षटक टाकण्यासाठी चेंडू डावखुरा वेगवान गोलंदाज रकीबुल हसनच्या हातात सोपवला. पण त्यावेळी डी सिल्वा स्ट्राईकवर स्ट्राईकवर आल्याचे पाहताच रंगपूर रायडर्सनं मेहंदी हसनला गोलंदाजीसाठी बोलवलं. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शाकीब मैदानात शिरला आणि पंचाशी वाद घालू लागला.
व्हिडिओ-
या सामन्यात नाणेफेक जिंकून फॉर्च्यून बरिशाल संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या रंगपूर रायडर्सच्या संघानं २० षटकात ७ विकेट्स गमावून १५८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना बरिशालच्या संघानं १९.२ षटकातच सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
संबंधित बातम्या