मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Kohli Naveen Fight : विराटशी पंगा घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजाला शाहिद आफ्रिदीने फटकारलं, म्हणाला...

Kohli Naveen Fight : विराटशी पंगा घेणाऱ्या अफगाणी गोलंदाजाला शाहिद आफ्रिदीने फटकारलं, म्हणाला...

May 03, 2023 06:49 PM IST

Virat Kohli and Naveen Ul Haq Fight : विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील वादात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने उडी घेतली आहे.

Shahid Afridi On Virat Kohli and Naveen Ul Haq Fight IPL 2023
Shahid Afridi On Virat Kohli and Naveen Ul Haq Fight IPL 2023 (HT)

Shahid Afridi On Virat Kohli and Naveen Ul Haq Fight IPL 2023 : आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौत झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतरही दोघांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळं आता कोहली आणि नवीन यांच्यातील वादामुळं अनेकांनी नाराजी व्यक्त करत दोन्ही खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय भारतासह पाकिस्तानातूनही कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन उल-हकला ट्रोल केलं जात आहे. त्यातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीची पाठराखण करत नवीन उल-हकला मोलाचा सल्ला दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएलमध्ये आरसीबी आणि लखनौतील सामन्यानंतर खेळाडूंमध्ये वादावादी झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ट्वीट करत म्हटलं आहे की, तरुण खेळाडूंनी आक्रमकता कमी करून नैसर्गिक खेळावर प्राधान्य द्यावं, असं मी नेहमीच सांगत असतो. निरुपयोगी गोष्टींमध्ये अडकून पडल्यास त्याचा तोटा होतो. अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघात माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्याशी माझे आजही चांगले संबंध आहे. विराट कोहलीशी नवीन उल-हकचं वर्तन चांगलं नव्हतं, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने आयपीएलमधील वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

LSG vs CSK IPL 2023 : सीएसकेच्या फिरकीसमोर लखनौची दाणादाण, पावसामुळं खेळ थांबला

कोणत्याही खेळाडूने क्रिकेटपटू म्हणून सहकाऱ्याचा आदर आणि सन्मान करणं आवश्यक असतं. प्रतिस्पर्धी खेळाडूंशी खिलाडूवृत्तीची भावना असायला हवी. विनाकारण मैदानावर वाद घालणं योग्य नाही. खेळाडूंनी नेहमी क्रिकेट आणि खेळाला पहिल्या क्रमांकावर ठेवायला हवं, असं म्हणत शाहिद आफ्रिदीने नवीन उल-हकला मैदानावर संयम ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. याशिवाय गौतम गंभीरशी झालेल्या वादावर शाहिद आफ्रिदीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्वीटवर नवीन उल-हकनेही प्रतिक्रिया देत त्याची बाजू मांडली आहे.

Kohli vs Naveen : ‘भारतात खेळायला आलोय, शिव्या ऐकण्यासाठी नाही’, नवीन उल-हकचा कोहलीला टोला

मी विराटच्या पायाखालची धूळ नाही- नवीन

शाहिद आफ्रिदीने केलेल्या ट्वीटला उत्तर देताना नवीन उल-हक म्हणाला की, मी नेहमी तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसारच वागत असतो. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूने एकमेकांना सन्मान करणं अपेक्षित आहे. क्रिकेट सज्जनांचा खेळ असला तरी विराट कोहलीने मला पायाखालची धूळ असल्याचं सांगू नये. माझ्या देशातही अनेक लोकांचे असेच विचार आहे. त्यामुळं मी माझ्याबद्दलच नाही तर अनेकांबद्दल बोलत असल्याचंही नवीन उल-हकने म्हटलं आहे.

WhatsApp channel