Shahid Afridi Daughter Marriage: पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा संघ निवडकर्ता शाहिद आफ्रिदीच्या घरी शहनाईचा आवाज घुमला आहे. त्याची मोठी मुलगी अक्सा आफ्रिदी हिचा विवाह नसीर नासिर खानसोबत (३० डिसेंबर) कराचीमध्ये पार पाडला. आफ्रिदीचा भावी जावई आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीनेही या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये शाहीन शाहिद आफ्रिदीसोबत उभा आहे, तर मौलवी नासिर लग्न लावताना दिसत आहेत. शाहीन दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे आणि पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये (PSL) पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
शाहीद आफ्रिदीची दुसरी मुलगी अंशा हिचेही लवकरच लग्न होणार आहे. अंशा आफ्रिदीचा विवाह डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीसोबत होणार आहे. रिपोर्ट्सनुसार शाहीन-अंशाचा हा निकाह सोहळा कराचीमध्ये होणार आहे. नंतर या जोडप्याचे रिसेप्शनही आयोजित केले जाईल. या लग्नानंतरच शाहीन शाह आफ्रिदी पीएसएलमध्ये सहभागी होणार आहे.
४५ वर्षीय शाहिद आफ्रिदीला अंशा, अक्सा, अस्मारा, अजवा आणि अरवा अशा ५ मुली आहेत.
काही दिवसांपूर्वी हारिस रौफदेखील विवाहबंधनात अडकला
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफनेही इस्लामाबादमध्ये मुजना मसूद मलिकसोबत लग्न केले आहे. हा सोहळा त्याच्या जवळच्या मित्र आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. हरिस रौफ आणि मुजना मलिक क्लासमेट्स होते. कॉलेजात असताना हारिस रौफ आणि मुजना एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दुसरीकडे पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज शादाब खाननेही आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
संबंधित बातम्या