कराचीमध्ये गुरुवारी (२२ सप्टेंबर) खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडचा १० विकेट्सने पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना २०० धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने तुफान फटकेबाजी केली. पाकिस्तानने १९.३ षटकात एकही विकेट न गमावता २०३ धावा करत सामना जिंकला. सामन्यानंतर स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने एक ट्विट केले आहे.
शाहीनने ट्विट करून खळबळ उडवून दिली
शाहीनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने बाबर आणि रिजवान यांना सेल्फीश खेळाडू म्हटले आहे. शाहीनने लिहिले आहे की, "आता बाबर आणि रिझवानची हकालपट्टी करण्याची वेळ आली आहे. या दोघांना संघाबाहेर काढले पाहिजे. शाहीनने हे ट्विट का केले, याचे उत्तर संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर शेवटच्या ओळीत मिळेल.
आफ्रिदीने पोस्टमध्ये लिहिले की, ' मला वाटते की आता कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानपासून संघाला मुक्ती देण्याची वेळ आली आहे. दोघेही सेल्फिश खेळाडू आहेत. ते नीट खेळले असते तर सामना १५ षटकांत संपला असता. दोघेही सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेले. याविरोधात आंदोलन सुरु करायला हवे. हो ना?'
बाबर-रिझवानच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
शाहीन आफ्रिदीचे हे ट्विट वाचल्यानंतर कोणालाही धक्का बसेल. लोकांना वाटेल की पाकिस्तान संघात फूट पडली आहे. पण ट्विटच्या खाली आफ्रिदीने एक ओळही लिहिली आहे. ही वाचल्यानंतर चाहत्यांचे सर्व गैरसमद दूर होतील.
शाहीनने आपल्या पोस्टच्या शेवटी लिहिले, 'या पाकिस्तानी संघाचा मला अभिमान आहे.' याचा सरळ अर्थ असा आहे, "की बाबर आझम आणि रिझवान यांच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांना शाहीनने चोख प्रत्युत्तर दिले आहे. कारण पाकिस्तानचा संघ पूर्णपणे बाबर-रिझवानवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू सलामीला येतात आणि सामना संपेपर्यंत टिकून राहण्याची जबाबदारी घेतात.
संबंधित बातम्या