मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shadab Khan Wedding: शादाब खानचं सकलेन मुश्ताकच्या मुलीशी गुपचूप लग्न, सोशल मीडियामुळे सर्वांना कळलं
Shadab Khan Wedding
Shadab Khan Wedding

Shadab Khan Wedding: शादाब खानचं सकलेन मुश्ताकच्या मुलीशी गुपचूप लग्न, सोशल मीडियामुळे सर्वांना कळलं

24 January 2023, 21:28 ISTRohit Bibhishan Jetnavare

shadab khan wedding saqlain mushtaq daughter : सध्या क्रिकेट विश्वात लग्नाचा मोसम सुरू आहे. २३ जानेवारीला दोन लग्न झाले. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक केएल राहुलने अथिया शेट्टीसोबत लग्न केले. तर दुसरीकडे पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खाननेही याच दिवशी प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी लग्न केले आहे.

सध्या क्रिकेट विश्वात लग्नाचा मोसम सुरू आहे. भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक केएल राहुलने सोमवारी (२३ जानेवारी) बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत सात फेरे घेतले. त्याच दिवशी स्टार ऑलराऊंडर शादाब खानने पाकिस्तानमध्ये लग्न केले आहे. शादाबने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली.

ट्रेंडिंग न्यूज

शादाब खानने पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक आणि माजी दिग्गज फिरकी गोलंदाज सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी लग्न केले आहे. शादाब खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. मात्र, शादाबने त्याचा एकही फोटो शेअर केलेला नाही.

शादाब खानने ट्विट केले की, 'आज माझे लग्न होते. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. ही एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. मी माझ्या गुरू साकी भाईच्या (सकलेन मुश्ताक) कुटुंबाचा सदस्य झालो आहे. क्रिकेट खेळायला लागल्यापासून मी वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन वेगळे ठेवले आहे. माझे कुटुंब देखील लाईम लाईटपासून दूर राहते. माझ्या पत्नीनेही हाच निर्णय घेतला आहे. मी सर्वांना विनंती करतो की याचा आदर करावा".

सोबतच, शादाबने शेवटी गंमतीने म्हटले आहे की, "जर तुम्हाला मला काही सलामी (भेटवस्तू) द्यायची असेल तर मी अकाउंट नंबर पाठवून देतो.'

पाकिस्तानी फलंदाज शान मसूदने निशा खानसोबत लग्न केलं

पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने त्याची मंगेतर निशा खानसोबत (२१ जानेवारी) लग्नगाठ बांधली. पेशावर येथे झालेल्या सोहळ्यात दोघांनी निकाह केला. या शानदार सोहळ्यात पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याची क्लासमेट मुजना मसूद मलिकसोबत लग्न केले होते. याशिवाय वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही ३ फेब्रुवारी २०२३ रोजी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अन्शा आफ्रिदीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.