Sarfaraz Khan : अखेर सरफराज खानचा संयम सुटला, इन्स्टाग्राम पोस्ट करत BCCI ला दाखवला आरसा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sarfaraz Khan : अखेर सरफराज खानचा संयम सुटला, इन्स्टाग्राम पोस्ट करत BCCI ला दाखवला आरसा

Sarfaraz Khan : अखेर सरफराज खानचा संयम सुटला, इन्स्टाग्राम पोस्ट करत BCCI ला दाखवला आरसा

Published Jun 25, 2023 04:04 PM IST

Sarfaraz Khan Reaction Video Viral : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एकीकडे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेल्या सरफराज खानकडे मात्र, टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.

Sarfaraz Khan
Sarfaraz Khan

Sarfaraz Khan Reaction Video Viral : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बीसीसीआयने शुक्रवारी (२३ जून) एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. पण या बदलाचा भाग सर्फराज खान होऊ शकला नाही.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एकीकडे अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे जबरदस्त फॉर्मात असलेल्या सरफराज खानकडे मात्र, टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा दुर्लक्ष केले आहे.

सरफराज खान नाराज?

सरफराज खान अनेक दिवसांपासून टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी मेहनत घेत आहे. परंतु निवडकर्ते त्याला संधी देत ​​नाहीत. यावर अनेक दिवसांपासून शांत असलेल्या सरफराजने आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने बीसीसीआयवर आपली भडास काढली आहे.

वास्तविक, सरफराज खानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो एकूण ४५ सेकंदांचा आहे. या व्हिडिओत त्याच्या फलंदाजीचे हायलाइट्स दिसत आहेत. यादरम्यान त्याने 'मंजर है' हे गाणे बॅकग्राऊंडला लावले आहे. त्याचवेळी सरफराजने कॅप्शनमध्ये वन लव्ह असे लिहिले आहे.

अशा स्थितीत संघात निवड न झाल्याने सरफराज खान नाराज असल्याचे मानले जात आहे. तसेच त्याच्या आणखी एका फोटोवर त्याने “लक्ष्य तो हर हाल में पाना है”, हे गाणे लावले आहे.

सुनील गावसकरही निराश

सर्फराज खानकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरही निराश झाले आहेत. त्यांनी अलीकडेच सांगितले की, सरफराज खानची गेल्या तीन रणजी हंगामातील सरासरी १०० च्या आसपास आहे. संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला आणखी काय करावे लागेल? त्याची संघात निवड व्हायला हवी होती".

सरफराजची प्रथम श्रेणीतील कामगिरी

जर आपण सरफराज खानच्या प्रथम श्रेणीतील कामगिरीबद्दल बोललो तर त्याने एकूण 37 सामने खेळताना ७९.६५ च्या सरासरीने ३५०५ धावा केल्या आहेत. त्याचवेळी, सरफराजच्या नावावर प्रथम श्रेणीत १३ शतके आणि ९ अर्धशतके आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या