मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sanju Samson: ‘त्या’ दोघांची गरज काय? संजूला डच्चू दिल्यानंतर चाहते संतापले

Sanju Samson: ‘त्या’ दोघांची गरज काय? संजूला डच्चू दिल्यानंतर चाहते संतापले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 09, 2022 03:42 PM IST

India Squad For Asia Cup T20: आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. संघात केएल राहुस आणि विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. पण संजू सॅमसनला डच्चू मिळाला आहे. त्यामुळे संजूचे चाहते बीसीसीआयवर प्रचंड संतापले आहेत.

Sanju Samson
Sanju Samson

India Squad For Asia Cup T20: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली आणि राहुलचे पुनरागमन झाले आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन, इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

आशिया चषक खेळणारा संघच काही किरकोळ बदलांसह यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकही खेळू शकतो, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत आता संजू, ईशान आणि शमीला विश्वचषकात संधी मिळणार नाही, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

त्यामुळे या खेळाडूंचे चाहते प्रचंड संतापलेले आहेत. विशेषत: संजू सॅमसनच्या चाहत्यांनी बीसीसीआयच्या विरोधाच प्रचंड रोष व्यक्त केला आहे.

संजू सॅमसन स्टँडबाय खेळाडूंमध्ये का नाही?-

सोशल मीडिया युजरने ट्वीटरवर म्हटले की, ‘संजू सॅमसन स्टँडबायमध्ये का नाही... त्याने काय चूक केली आहे.. तो नेहमी आत बाहेर होत असतो. अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा हे एकसारखेच गोलंदाज आहेत, त्यांच्यात फक्त एकाची निवड करायला हवी. तुम्हाला दोघांची गरज नाही. तसेच, UAE मधील संजूचा रेकॉर्ड दीपक हुड्डा पेक्षा चांगला आहे’.

तीन खेळाडू स्टँडबाय

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नव्हते. सध्या ते बंगळुरू येथील एनसीएमध्ये आहेत. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चहर या तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवण्यात आले आहे.

१५ खेळाडूंचा संघ 

जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. यामुळे त्याला संघात स्थान मिळालेले नाही.

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन , युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.

२७ ऑगस्टपासून स्पर्धा-

२७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत UAE मध्ये होणाऱ्या आशिया कप २०२२ मध्ये सहा संघ सहभागी होणार आहेत. श्रीलंका, गतविजेते भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान याआधीच स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी पात्रता स्पर्धेनंतर सहावा संघ निश्चित केला जाईल. २० ऑगस्टपासून हाँगकाँग, कुवेत, सिंगापूर आणि यूएईसह सहा संघांच्या पात्रता स्पर्धेला सुरुवात होईल.

WhatsApp channel