Australia Open 2023: सानिया मिर्झा- रोहन बोपण्णा जोडीची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक!
Sania Mirza- Rohan Bopanna: भारताची स्टार महिला टेनिसपूट सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णाच्या जोडीने ऑस्ट्रेलिया ओपन २०२३ स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये धडक दिली आहे.
Australian Open mixed doubles Semi Final: भारताच्या सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि रोहन बोपण्णा (Rohan Bopanna) यांनी ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित ग्रेट ब्रिटनच्या नील स्कुप्स्की (Neal Skupski) आणि यूएसएच्या डेसिरिया क्रॉझिक (Desirae Krawczyk) यांचा ७-६(५) ६-७(५) १०-६ असा पराभव केला.
ट्रेंडिंग न्यूज
भारतीय जोडीने सामन्याची चमकदार सुरुवात केली आणि पहिला सेट ७-६ अशा फरकाने जिंकला. मात्र, त्याने दुसरा सेट ६-७ अशा फरकाने गमावला. या स्पर्धेतील पहिला सेट गमावल्यानंतर भारतीय जोडीने शानदार पुनरागमन केले आणि तिसरा सेट १०-६ अशा फरकाने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.तत्पूर्वी, भारतीय जोडीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जेलेना ओस्टापेन्को आणि डेव्हिड वेगा हर्नांडेझ या लॅटव्हियन आणि स्पॅनिश जोडीविरुद्ध वॉकओव्हर मिळाला होता.
सानिया आणि बोपण्णा जोडीने मिश्र दुहेरीत आतापर्यंत फक्त एक सेट गमावला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ही पुरुष दुहेरी जोडी पहिल्याच फेरीतून बाहेर पडली. महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत सानिया आणि कझाकिस्तानच्या अॅना डॅनिलिना यांना पराभव स्वीकारावा लागला.
सानियाची ही शेवटचे ग्रँडस्लॅम असल्याचे तिने या आधी स्पष्ट केले आहे. यामुळे ग्रँडस्लॅम जिंकून आपल्या कारकिर्दीचा शेवट गोड करण्याचा तिचा प्रयत्न असेल.सानिया मिर्झाने आतापर्यंत ३ मिश्र दुहेरी आणि ३ महिला दुहेरीसह एकूण ६ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. तिने २०१५ मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन आणि २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीमध्ये जिंकले. याआधी तो २०११ मध्ये फ्रेंच ओपनचा अंतिम सामना खेळला होता. त्याचवेळी २००९ मध्ये विम्बल्डन, २०१२ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०१४ मध्ये मिश्र दुहेरीत यूएस ओपन जिंकले. सानिया मिर्झा आणि महेश भूपतीने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.