Sania Mirza News: भारतातील आणि जगभरातील प्रसिद्ध टेनिस स्टार सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह याचीही दुबई स्पोर्ट्स अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. दुबईत आयोजित एका महत्त्वाच्या कार्यक्रमादरम्यान ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाच्य माध्यमातून या दोन्ही माजी खेळाडूंच्या योगदानबद्दल सांगण्यात आले.
सानिया मिर्झाने खेळातून निवृत्ती घेतली असली तरी तिला आजही तिच्या खेळाबद्दल सन्मानित केले जाते. सानिया मिर्झाच्या कामगिरीचे केवळ भारतातच नव्हेतर संपूर्ण जगभरात कौतुक केले जाते. आता तिला मोठा सन्मान आणि जबाबदारी मिळाली आहे. सानिया मिर्झा १२ नोव्हेंबर रोजी दुबई स्पोर्ट्स रिट्रीट नावाच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती, जिथे तिची दुबई स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सानिया मिर्झाची दुबई स्पोर्ट्स ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतर चाहते तिचे अभिनंदन करत आहे.सानिया मिर्झाने या कार्यक्रमाशी संबंधित अनेक व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. सानिया मिर्झा अनेक दिवसांपासून आपल्या मुलासह दुबईत राहत आहे. दुबई हे सानिया मिर्झाचे दुसरे घर आहे. दुबईत ती पाम जुमेराह येथील एका आलिशान घरात राहते, जिथे इझान शिकत आहे आणि तो दुबईमध्ये फुटबॉलचा सरावही करतो. यामुळेच शेख हमदान यांनी त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली.
सानिया ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिने २००३ ते २०१३ या कालावधीत महिला टेनिस असोसिएशन म्हणजेच डब्लूटीएमध्ये एकेरी आणि दुहेरीत अव्वल भारतीय टेनिसपटू म्हणून आपले स्थान कायम राखले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी जगभरात प्रसिद्ध झालेल्या सानिया मिर्झाला २००६ मध्ये 'पद्मश्री' पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा बहुमान मिळवणारी ती सर्वात तरुण खेळाडू आहे. २००६ मध्ये तिला डब्लूटीएचा 'मोस्ट इंप्रेसिव्ह न्यूकमर अवॉर्ड' देण्यात आला. तिने २००८ बीजिंग, २०१२ लंडन, २०१६ रिओ आणि २०२० टोकियो या चार ऑलिंपिकमध्येही त्याने भाग घेतला.
सानिया मिर्झा ही भारताने पाहिलेली सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटू आहे. सहा वेळा ग्रँडस्लॅम चॅम्पियन, दुहेरीत माजी जागतिक क्रमांक एक आणि चार वेळा ऑलिंपियन, सानिया मिर्झाने २००३ ते २०२३ पर्यंतच्या तिच्या शानदार कारकिर्दीत भारतीय टेनिससाठी नवीन उंची गाठली आहे.हिंगिस आणि मिर्झाच्या जोडीने २०१५ ते २०१६ दरम्यान तीन ग्रँड स्लॅम आणि दोन डब्ल्यूटीए फायनल्स जेतेपद पटकावले