sania mirza going to hajj yatra 2024 : भारताची माजी महान टेनिसपटू सानिया मिर्झा पवित्र हज यात्रेला निघाली आहे. सानियाने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली. तिने आपल्या आयुष्यात जे काही पाप घडले आहे त्याबद्दल अल्लाह आपल्याला नक्कीच माफ करेल अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर ५ महिन्यांनी सानिया पुन्हा चर्चेत आली आहे.
सानिया मिर्झाने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, "माझ्या प्रिय मित्रांनो, मला हजच्या पवित्र यात्रेला जाण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी माझ्या आयुष्यात बदलाच्या प्रवासाला सुरुवात करत आहे आणि माझ्या सर्व चुकांसाठी तुम्हा सर्वांची माफी मागते. मला आशा आहे की अल्लाह माझी प्रार्थना ऐकेल आणि मला मार्गदर्शन करेल.
मी खूप भाग्यवान समजते. कृपया मला तुमच्या विचारांमध्ये आणि प्रार्थनांमध्ये ठेवा. माझ्यासाठी हा आयुष्याचा खूप खास प्रवास असेल. मला आशा आहे की मी एक चांगली व्यक्ती बनू शकेन."
सानिया मिर्झाच्या पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं की, कृपया तुमच्या प्रार्थनांमध्ये सानियाची आठवण ठेवा. तिने सानियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
हज ही सौदी अरेबियातील मक्केची वार्षिक इस्लामी तीर्थयात्रा आहे. इस्लाममधील धार्मिक मान्यतेनुसार, शारिरीक आणि आर्थिकरित्या सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लीम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे. हज हा इस्लामच्या पाच कर्तव्यांपैकी एक कर्तव्य आहे.
हज यात्रा वर्षातून एकदा होते आणि यंदा म्हणजेच २०२४ मध्ये ती १४ जून ते १९ जून दरम्यान केली जाईल.
संबंधित बातम्या