Sania Mirza Retire : सानियाचा टेनिसला अलविदा! ‘या’ मानाच्या स्पर्धेद्वारे करणार करिअरचा शेवट
sania mirza announces retirement : भारताची स्टार महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्तीची घोषणा केली आहे. येत्या काही महिन्यांत ती अखेरची कोर्टवर दिसणार आहे.
टेनिस स्टार सानिया मिर्झाने निवृत्ती जाहीर केली आहे. १६ जानेवारीपासून होणारी ऑस्ट्रेलियन ओपन ही सानियाची शेवटची स्पर्धा असेल. सानिया मिर्झाने ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली. सानियाने यापूर्वी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या WTA 1000 दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर निवृत्त होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता तिने ऑस्ट्रेलियन ओपनद्वारेच आपली कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपन २०२३ मधील महिला दुहेरी स्पर्धेत कझाकिस्तानच्या अना डॅनिलिनासोबत सहभागी होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
३६ वर्षीय सानिया मिर्झाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "ऑस्ट्रेलियन ओपननंतर तिला तिच्या मुलासोबत अधिक वेळ घालवायला आवडेल. तसेच, तिने लिहिले की, '३० वर्षांपूर्वी हैदराबादमधील ६ वर्षांची मुलगी तिच्या आईसोबत पहिल्यांदा कोर्टवर गेली आणि प्रशिक्षकाने टेनिस कसे खेळायचे ते समजावून सांगितले. मला वाटत होते की मी टेनिस शिकण्यासाठी खूप लहान आहे. माझ्या स्वप्नांसाठीचा लढा वयाच्या ६ व्या वर्षीच सुरू झाला.