मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sakshi Malik: बजरंगनंतर साक्षी मलिकनेही पटकावले सुवर्णपदक
Sakshi Malik
Sakshi Malik
05 August 2022, 22:59 ISTRohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
05 August 2022, 22:59 IST
  • CWG 2022 Wrestling: साक्षी मलिकने सुवर्णपदक पटकावले आहे. साक्षी मलिकने महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोडिनेझ गोन्झालेझचा पिन फॉलद्वारे पराभव केला.

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आठव्या दिवशी भारताच्या चार कुस्तीपटूंनी फायनल गाठली आहे. अंतिम फेरीत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. तर अंशू मलिकला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

तसेच, दीपक पुनिया हा देखील अंतिम फेरीत आपला सामना खेळणार आहे. सोबतच मोहित ग्रेवाल आणि दिव्या काकरन यांनी कांस्यपदकाच्या लढतीत स्थान निश्चित केले आहे.

साक्षी मलिकने सुवर्णपदक पटकावले आहे. साक्षी मलिकने महिलांच्या ६२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या अना गोडिनेझ गोन्झालेझचा (pin fall) ४-४ असा पराभव केला. साक्षी मलिक एका क्षणी ४-० ने पिछाडीवर होती. त्यानंतर साक्षीने विरोधी खेळाडूला चित करुन चार गुण मिळवले. त्यानंतर साक्षीने पिन फॉलनुसार ((By Fall)) एकाच डावात सामना जिंकला. साक्षीने यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य (२०१४) आणि कांस्यपदक (२०१८) जिंकले होते.

साक्षीच्या सुवर्णानंतर बर्मिंगहॅममधील कुस्तीतील भारताचे हे दुसरे आणि एकूण आठवे सुवर्णपदक ठरले आहे. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे तिसरे पदक आहे. साक्षीच्या आधी बजरंगने सुवर्ण कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले आहे.

बजरंग पुनिया सुवर्ण पदक-

<p>Bajrang Punia</p>
Bajrang Punia

बजरंग पुनियानेही भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलोमध्ये बजरंग पुनियाने कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा ९-२ असा पराभव केला.

बजरंगने यापूर्वी २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्याचवेळी २०१४ मध्ये त्याने रौप्य पदक जिंकले होते.

अंशू मलिकला रौप्य पदक-

<p>anshu malik</p>
anshu malik

भारतीय कुस्तीपटू अंशू मलिकला फ्रीस्टाइल ५७ किलो गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशूचा अंतिम फेरीत नायजेरियाच्या ओडानायो फोलासाडोने ३-७ असा पराभव केला. ओडानायोने सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर अंशूला पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाले आहे. तिचीही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.

भारताचे पदक विजेते

८ सुवर्ण: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॅरा-पॉवरलिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक

८ रौप्य: संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक

७ कांस्य: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर