रणवीर सिंहचा वाढदिवस, मास्टर ब्लास्टर सचिनने दिल्या हटके शुभेच्छा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही रणवीरला एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या. या फोटोत सचिन आणि कॉलेज कुमार रणवीर सिंह हे दिसत आहेत.
आपल्या हटके स्टाईलने चाहत्यांचं लक्ष वेधून घेणारा लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचा आज ६ जुलै रोजी वाढदिवस आहे. आज रणवीर त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीरच्या वाढदिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही एक खास फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या फोटोत सचिन आणि कॉलेज कुमार रणवीर सिंह हे दिसत आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
या फोटोद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने रणवीरला एक प्रश्न देखील विचारला आहे. "हा फोटो कधीचा आहे? असा प्रश्न मास्टर ब्लास्टरने विचारला आहे. मात्र, रणवीरने अजून या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.
सध्याच्या घडीला रणवीर हा बॉलीवूडमधील सर्वात मेहनती अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा आताच प्रदर्शित झालेला जयेशभाई जोरदार हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करु शकला नाही. मात्र, रणवीर त्याच्या आगामी सर्कस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. रणवीरला या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा असतील.
वाढदिवसा दिवशी रणवीरने शेअर केली हटके सेल्फी-
दरम्यान, रणवीर यानेही आपल्या वाढदिवसानिमित्त आज त्याचा एक समुद्रकिनाऱ्यावरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याचे केस सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. त्याचे केस अगदी पिंजारलेल्या अवस्थेत आहेत. उभे वाढलेले अस्ताव्यस्त केस, वाढलेली दाढी आणि मिशी, डोळ्यावर गॉगल अशा अवस्थेत रणवीरला पाहून चाहतेही चकित झाले आहेत. त्याच्या या फोटोवरही चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे, तसेच अनेकांनी रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.