sachin tendulkar : विनेश फोगटला रौप्य पदक का द्यायला हवं? सचिन तेंडुलकरनं सविस्तर मांडलं मत-sachin tendulkar reaction on vinesh phogat controversy in paris olympics 2024 ,क्रीडा बातम्या
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  sachin tendulkar : विनेश फोगटला रौप्य पदक का द्यायला हवं? सचिन तेंडुलकरनं सविस्तर मांडलं मत

sachin tendulkar : विनेश फोगटला रौप्य पदक का द्यायला हवं? सचिन तेंडुलकरनं सविस्तर मांडलं मत

Aug 10, 2024 05:32 PM IST

sachin tendulkar on vinesh phogat : नियमबाह्य गोष्टी करून विनेशने सामने जिंकले असते तर तिचे रौप्य पदक हिसकावणे योग्य होते, पण… काय म्हणाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर?

Vinesh Phogat : विनेश फोगटला रौप्य पदक का देण्यात यावे? सचिन तेंडुलकरने सविस्तरपणे सांगितले, वाचा
Vinesh Phogat : विनेश फोगटला रौप्य पदक का देण्यात यावे? सचिन तेंडुलकरने सविस्तरपणे सांगितले, वाचा (AFP)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये ५० किलो वजनी गटातील कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी भारताच्या विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले होते. यामुळे विनेशला पदक गमवावे लागले.

वास्तविक, विनेश फोगट अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर तिचे किमान रौप्य पदक निश्चित झाले होते, जर ती जिंकण्यात यशस्वी झाली असती तर तिला सुवर्णपदक मिळाले असते आणि ती हरली असती तर तिला रौप्य पदक तरी मिळाले असते.

पण, विनेशला अपात्र घोषित केल्याने पदक गमवावे लागले. यानंतर विनेश फोगट वादावर अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्या. आता या संपूर्ण वादावर माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपले मत व्यक्त केले आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे, की प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि त्या नियमांना संदर्भाने पाहणे आवश्यक आहे, कदाचित काहीवेळा पुन्हा पाहणे देखील आवश्यक आहे. विनेश फोगट योग्य खेळ खेळून अंतिम फेरीसाठी पात्र ठरली, पण यानंतर वजनाच्या आधारावर ती फायनलसाठी अपात्र ठरली. त्यामुळे तिच्याकडून रौप्यपदक हिरावून घेणे हे तर्कशास्त्र आणि क्रीडा समजण्याच्या पलीकडे आहे."

सचिन तेंडुलकर याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपला फीडबॅक देत आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन पुढे लिहितो, “एखाद्या खेळाडूला कामगिरी वाढवणाऱ्या औषधांच्या वापरामुळे अपात्र ठरवण्यात आले असते, तर तिच्याकडून पदक हिरावून घेणे योग्य होते. मात्र, विनेश तिच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून पहिल्या दोन क्रमांकावर पोहोचली, ती निश्चितपणे रौप्य पदकाची पात्र आहे, आम्ही सर्वजण क्रीडा न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, विनेशला रौप्य पदक मिळावे, अशी प्रार्थना करूया.”

विशेष म्हणजे, शुक्रवारी विनेश फोगट प्रकरणात क्रीडा लवादाच्या न्यायालयाने सांगितले की, महिलांच्या ५० किलो गटाच्या अंतिम फेरीतून अपात्र ठरविण्याबाबत विनेश फोगटच्या याचिकेवर निर्णय सध्या सुरू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी येईल.