मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Sachin Tendulkar: सचिन शिकतोय नवा खेळ, अंजलीसोबतचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Sachin Tendulkar: सचिन शिकतोय नवा खेळ, अंजलीसोबतचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Dec 29, 2022 04:08 PM IST

Sachin Tendulkar Learns Kayaking in Thailand: सचिन तेंडुलकर सध्या थायलंडमध्ये आहे. नुकताच त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन क्रिकेटऐवजी दुसरा खेळ शिकताना दिसत आहे.

Sachin Tendulkar Learns Kayaking in Thailand
Sachin Tendulkar Learns Kayaking in Thailand

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या पत्नी अंजलीसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सचिन थायलंडमध्ये पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो क्रिकेट ऐवजी इतर खेळात हात आजमावताना दिसत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि वेळोवेळी त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. चाहत्यांनाही त्याचे नवनवीन व्हिडिओ आणि फोटो खूप आवडतात.

४९ वर्षीय सचिन तेंडुलकरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो कयाकिंगचे ट्रेनिंग घेताना दिसत आहे. तसेच, त्यानंतर तो पत्नी अंजलीसोबत नावेतून समुद्रात खूप दूर गेलेला दिसत आहे.

सचिन काही दिवसांपासून थायलंडमध्ये

दरम्यान, क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन गेल्या काही दिवसांपासून थायलंडमध्ये आहे. त्याने काही दिवसांपूर्वीचा त्याचा एक सुंदर सेल्फीही शेअर केला होता. यापूर्वी ख्रिसमसच्या निमित्ताने सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तो अनाथाश्रमातील मुलांसोबत ख्रिसमस साजरा करताना दिसत होता. यावेळी त्यांनी मुलांना मिठाईचे वाटप करून त्यांच्यासोबत कॅरमचा आनंदही घेतला होता.

सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये क्रिकेटच्या मैदानावर दिसला होता. त्याच्या नेतृत्वाखाली इंडिया लिजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजची ट्रॉफी जिंकली. इंडिया लिजेंड्सने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या