IPL Live Cricket Score, RR vs SRH Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 चा ५२ वा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला. सोबतच हैदराबादने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने हैदराबादसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हैदराबादने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून हे लक्ष्य गाठले.
आयपीएलच्या एका रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ४ गडी राखून पराभव केला. जयपूर येथे झालेल्या सामन्यात राजस्थानने सनरायझर्सला विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या चेंडूवर लक्ष्य गाठले.
सनरायझर्सला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावा करायच्या होत्या. शेवटच्या चेंडूवर संदीप शर्माने अब्दुल समदला बाद केले, पण तो नो-बॉल ठरला. यानंतर सनरायझर्सला फ्री-हिट मिळाला, त्यावर अब्दुल समदने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने दमदार सुरुवात केली. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीला उतरलेल्या अनमोलप्रीत सिंगने अभिषेक शर्मासह ५.५ षटकांत ५१ धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने अनमोलप्रीतला हेटमायरकडे झेलबाद करून ही भागीदारी मोडली. अनमोलप्रीतने २५ चेंडूत ३३ धावा केल्या. अनमोलप्रीत बाद झाल्यानंतर राहुल त्रिपाठीने अभिषेक शर्मासोबत ६५ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची शानदार खेळी केली.
यानंतर क्रीजवर आलेल्या हेनरिक क्लासेनने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. मात्र, त्याची खेळी फार काळ टिकली नाही. युझवेंद्र चहलने बटलरकरवी क्लासेनला झेलबाद केले. यानंतर चहलने एकाच षटकात राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करामचे विकेट घेत राजस्थानला सामन्यात परत आणले.
नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी मिळून ५ षटकात ५४ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत यशस्वी जैस्वालचे योगदान अधिक होते. मार्को यानसेनने यशस्वी जैस्वालला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. यशस्वीने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावांची खेळी केली.
पहिला विकेट पडल्यानंतर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर दुर्दैवी ठरला तो शतकी खेळीपासून केवळ ५ धावा दूर असताना बाद झाला. बटलरने ५९ चेंडूंत १० चौकार आणि चार षटकारांसह ९५ धावांची खेळी केली. डावाच्या १९व्या षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बटलर एलबीडब्ल्यू आऊट झाला. बटलर आणि सॅमसन यांच्यात १३८ धावांची भागीदारी झाली. संजूने ३८ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. संजूने आपल्या खेळीत ५ षटकार आणि ४ चौकार लगावले.
११६ धावांच्या स्कोअरवर सनरायझर्स हैदराबादची दुसरी विकेट पडली. अभिषेक शर्मा ३४ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने त्याला चहलकरवी झेलबाद केले. अभिषेकने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार मारले. आता हेनरिक क्लासेन राहुल त्रिपाठीसोबत क्रीजवर आहे. हैदराबादची धावसंख्या १३ षटकांत २ बाद ११७ अशी आहे.
सनरायझर्स हैदराबादची पहिली विकेट ५१ धावांवर पडली. अनमोलप्रीत सिंग २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत एक षटकार आणि चार चौकार मारले. युझवेंद्र चहलने त्याला शिमरॉन हेटमायरकरवी झेलबाद केले. पॉवरप्लेमध्ये हैदराबादने एक गडी गमावून ५२ धावा केल्या. आता राहुल त्रिपाठी अभिषेक शर्मासोबत क्रीजवर आहे. सात षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या एका विकेटवर ५८ अशी आहे.
२१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी सुरु आहे. अनमोलप्रीत सिंग आणि अभिषेक शर्मा यांनी डावाची सुरुवात केली आहे. राजस्थानसाठी संदीप शर्माने पहिले षटक केले. हैदराबादची धावसंख्या एका षटकाच्या खेळानंतर बिनबाद ४ आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दोन गडी गमावून २१४ धावा केल्या असून हैदराबादसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक ९५ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार संजू सॅमसनने ६६ धावांची नाबाद खेळी खेळली. यशस्वी जैस्वाल ३५ धावा करून बाद झाला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को जॅनसेनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
१९२ धावांवर राजस्थान रॉयल्सची दुसरी विकेट पडली. जोस बटलर ५९ चेंडूत ९५ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. मात्र, त्याचे आयपीएलमधील सहावे शतक हुकले.
संजू सॅमसनने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि दोन चौकार मारले आहेत. बटलरसोबत शतकी भागीदारी करून त्याने आपल्या संघाची धावसंख्या २०० धावांच्या जवळ पोहोचवली आहे.
राजस्थान रॉयल्सची धावसंख्या एक बाद १५० च्या पुढे गेली आहे. संजू सॅमसन आणि जोस बटलर यांच्यात शतकी भागीदारी झाली असून राजस्थानचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. १६ षटकांनंतर राजस्थानची धावसंख्या एका विकेटवर १६८ आहे.
राजस्थान रॉयल्सने १२ षटकात एक बाद १२५ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन आणि जोस बटलर तुफानी पद्धतीने धावा करत आहेत आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जात आहेत. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी झाली आहे. बटलर ५१ तर संजू ३१ धावांवर खेळत आहे.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जो रूट हा सामना राजस्थानकडून खेळत आहे. त्याचा आयपीएलमधला हा पहिलाच सामना असेल. त्याचवेळी हैदराबादचा संघही दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. हॅरी ब्रूकच्या जागी ग्लेन फिलिप्सला संधी देण्यात आली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर, कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल