टी-20 मध्ये भुवीने ३९ चेंडूत ५ वेळा केलीय बटलरची शिकार, SRH vs RR सामन्याआधी हे रंजक आकडे पाहा
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  टी-20 मध्ये भुवीने ३९ चेंडूत ५ वेळा केलीय बटलरची शिकार, SRH vs RR सामन्याआधी हे रंजक आकडे पाहा

टी-20 मध्ये भुवीने ३९ चेंडूत ५ वेळा केलीय बटलरची शिकार, SRH vs RR सामन्याआधी हे रंजक आकडे पाहा

May 07, 2023 02:46 PM IST

SRH vs RR IPL 2023 : आयपीएल 2023 च्या ५२व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

SRH vs RR IPL 2023
SRH vs RR IPL 2023

RR vs SRH Interestig stats : आयपीएल 2023 चा ५२ वा सामना आज (७ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यात होणार आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर सयंकाळी ७:३० वाजल्यापासून खेळवला जाईल. दोन्ही संघांना गेल्या पाच सामन्यांत प्रत्येकी एकच विजय मिळवता आला आहे. परिणामी, आता जवळपास प्रत्येक सामना सनरायझर्ससाठी 'करा किंवा मरो' असा असणार आहे, तसेच राजस्थानने आता सामना गमावला तर प्लेऑफच्या शर्यतीत ते पिछाडीवर पडतील.

अशा परिस्थितीत आजच्या सामन्यात हे संघ विजयाची नोंद करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतील. म्हणजेच हा सामना दोन्ही संघां सामना निकराचा असणार आहे.

राजस्थान-हैदराबाद सामन्याआधी हे रंजक आकडे पाहा

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला ३९ चेंडूत ५ वेळा बाद केले आहे. आयपीएलमध्ये दोघे ६ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत पण येथे एकदाही भुवीला बटलरची विकेट मिळाली नाही.

आयपीएलमध्ये संदीप शर्मासमोर मयंक अग्रवाल नेहमीच फ्लॉप ठरला आहे. मयंकने संदीपच्या ४४ चेंडूत केवळ ४७ धावा केल्या असून यादरम्यान तो तीनदा बाद झाला आहे.

मयंक अग्रवाल आणि युझवेंद्र चहल यांच्यातील आकडेवारीही रंजक आहे. मयंकने चहलच्या ४९ चेंडूत ७२ धावा केल्या आहेत पण यादरम्यान तो ६ वेळा चहलची शिकार झाला आहे.

आयपीएल 2023 मध्ये, पॉवरप्ले दरम्यान राजस्थान रॉयल्स प्रति षटक ९.४३ धावा करत आहे. दुसरीकडे, या बाबतीत SRH संघाचा रनरेट केवळ ७.५९ आहे.

IPL 2023 मधील सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे, ज्याने या हंगामात एकाही फलंदाजाने २०० धावांचा टप्पा ओलांडला नाही. याउलट, राजस्थान रॉयल्सच्या ५ फलंदाजांनी या हंगामात २००+ धावा केल्या आहेत.

या आयपीएलमध्ये एसआरएचसाठी फिरकीविरुद्ध हेनरिक क्लासेन सर्वोत्तम ठरला आहे. क्लासेनने या मोसमात १७५.४७ च्या स्ट्राईक रेटने ५३ चेंडूत ९३ धावा केल्या आहेत. यादरम्यान तो फक्त एकदाच बाद झाला आहे.

Whats_app_banner