IPL Cricket Score, RR vs RCB Indian Premier League 2023 : आयपीएलच्या ६०व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने त्यांचा ११२ धावांनी पराभव केला. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला.
आयपीएल 2023 च्या ६०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानला १७२ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ १०.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
आयपीएल 2023 च्या ६०व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने राजस्थानला १७२ धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ १०.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. या विजयासह आरसीबीचा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आला आहे.
तर राजस्थान रॉयल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. या पराभवानंतर राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर घसरला. सहा विजय आणि सात पराभवानंतर १३ सामन्यांत त्यांचे १२ गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेट +०.१४० आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना १९ मे रोजी पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठा विजय आवश्यक आहे. यासोबतच इतर संघांच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचे फलंदाज सुरुवातीपासूनच पॅव्हेलियनकडे जाण्याचा मार्ग शोधत होते. सलामीवीर फलंदाज जोस बटलर आणि यशस्वी जैस्वाल यांना खातेही उघडता आले नाही. तर संजू सॅमसन (४), जो रूट (१०), देवदत्त पडिक्कल (४) आणि ध्रुव जुरेल (१) यांनाही विशेष काही करता आले नाही.
फक्त शिमरॉन हेटमायर लढू शकला. हेटमायरने १९ चेंडूत ३५ धावा केल्या ज्यात चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता.
राजस्थान रॉयल्सचे फक्त दोन फलंदाज (संजू सॅमसन आणि हेटमायर) दुहेरी आकडा गाठू शकले. आरसीबीकडून वेन पारनेलने सर्वाधिक तीन बळी घेतले. दुसरीकडे कर्ण शर्मा आणि मायकेल ब्रेसवेल यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले. याशिवाय ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी अर्धशतक झळकावले. तर अखेरच्या षटकात अनुज रावतने वेगाने धावा करत संघाला १७० धावांच्या पुढे नेले. डुप्लेसिसने ५५ आणि मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अनुज रावतने ११ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
विराट कोहलीने १८ धावा केल्या. मायकेल ब्रासवेल नऊ चेंडूत नऊ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाला. महिपाल लोमरोरला एकच धाव करता आली. राजस्थानकडून केएम आसिफ आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. संदीप शर्माला एक विकेट मिळाला.
राजस्थान रॉयल्सला सातव्या षटकात सहावा धक्का बसला. मायकेल ब्रेसवेलने ध्रुव जुरेलला बाद केले. जुरेलला सात चेंडूत केवळ एक धाव करता आली. त्याला महिपाल लोमरोरने बाऊंड्रीवर झेलबाद केले. जुरेलनंतर आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विन बाद झाला. एकही चेंडू न खेळता तो धावबाद झाला. राजस्थानने आठ षटकांत सात गडी गमावून ५० धावा केल्या आहेत. शिमरॉन हेटमायर १३ चेंडूत २८ धावा करून क्रीजवर आहे. अॅडम झाम्पाने अद्याप खाते उघडलेले नाही.
राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या षटकात दोन धक्के बसले. वेन पारनेलने दुसऱ्या चेंडूवर जोस बटलरला बाद केले. बटलरला खातेही उघडता आले नाही. मोहम्मद सिराजने त्याचा झेल घेतला. बटलरपाठोपाठ कर्णधार संजू सॅमसनही बाद झाला. चौथ्या चेंडूवर पारनेलने त्याला अनुज रावतकरवी झेलबाद केले. सॅमसनला पाच चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. राजस्थानने दोन षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ११ धावा केल्या आहेत. देवदत्त पडिक्कल चार आणि जो रूट एक धाव करून खेळत आहे.
राजस्थान रॉयल्सला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालला बाद केले. जैस्वालने दोन चेंडूंचा सामना केला. त्याला खाते उघडता आले नाही. विराट कोहलीने जैस्वालचा झेल घेतला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसन क्रीझवर आला. जोस बटलर दुसऱ्या टोकाला उभा आहे.
आरसीबीने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी २० षटकात ५ गडी बाद १७१ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलने आरसीबीसाठी अर्धशतक झळकावले. अखेरच्या षटकात अनुज रावतने वेगाने धावा करत संघाला १७० धावांच्या पुढे नेले. डुप्लेसिसने ५५ आणि मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अनुज रावतने ११ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
विराट कोहलीने १८ धावा केल्या. मायकेल ब्रासवेल नऊ चेंडूत नऊ धावा करून नाबाद राहिला. दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाला. महिपाल लोमरोरला एकच धाव करता आली. राजस्थानकडून केएम आसिफ आणि अॅडम झाम्पाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. संदीप शर्माला एक विकेट मिळाला.
अॅडम झाम्पाने आरसीबीला दुहेरी झटका दिला. त्याने १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महिपाल लोमररला ध्रुव जुरेलकरवी झेलबाद केले. लोमररला दोन चेंडूत केवळ एक धाव करता आली. त्याच्यापाठोपाठ फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिकही अपयशी ठरला. तिसर्या चेंडूवर झाम्पाने कार्तिकला एलबीडब्ल्यू केले. दोन चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याला खातेही उघडता आले नाही. आरसीबीने १६ षटकांत ४ गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत.
आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. आयपीएलच्या चालू मोसमातील त्याचे हे सातवे अर्धशतक आहे. अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. डुप्लेसिसने ४४ चेंडूत ५५ धावा केल्या. यादरम्यान त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. केएम आसिफच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने डुप्लेसिसचा झेल घेतला.
विराट कोहली बाद झाल्यानंतर फॅफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी डावाची धुरा सांभाळली आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे.
सातव्या षटकात आरसीबीला पहिला धक्का बसला. अनुभवी फलंदाज विराट कोहली केएम आसिफचा बळी ठरला. यशस्वी जैस्वालने त्याचा झेल घेतला. कोहलीने १९ चेंडूत १८ धावा केल्या. त्याने आपल्या डावात फक्त एक चौकार मारला. कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेल क्रीजवर आला. आरसीबीने आठ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ६१ धावा केल्या आहेत.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने राजस्थान रॉयल्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जोश हेझलवूडऐवजी वेन पारनेल आणि वनिंदू हसरंगाऐवजी मायकेल ब्रेसवेल खेळत आहे. राजस्थानबद्दल बोलायचे झाले तर ट्रेंट बोल्टच्या जागी अॅडम झाम्पाची निवड करण्यात आली आहे.