Rohit Sharma: रितिका पुन्हा रोहितच्या प्रेमात पडली, दाखवलेल्या शौर्याबद्दल भावूक होत म्हणाली...
Rohit sharma wife Ritika Sajdeh Reaction, India Vs Bangladesh: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीनंतरही कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी केली. रोहितच्या या शौर्यावर त्याची पत्नी रितिका सजदेहनेही प्रतिक्रिया दिली आहे. तिने रोहितवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावली आहे. बुधवारी (७ डिसेंबर) झालेल्या दुसऱ्या वनडेतील पराभवामुळे टीम इंडिया मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. भारताने ही मालिका गमावली असली तरी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्वांची मनं जिंकली आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
अंगठ्याला गंभीर दुखापत असूनही रोहित ९व्या क्रमांकावर फलंदाजीस आला आणि त्याने बांगलादेशी गोलंदाजांची पिसे काढली. मात्र, तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. रोहितने जखमी अवस्थेतही २८ चेंडूत ३ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांसह ५८ कुटल्या.
रितिकाची इन्स्टा स्टोरी
रोहित शर्माने दाखवलेल्या या शौर्यावर त्याची पत्नी रितिका सजदेह हिने प्रतिक्रिया दिली आहे. रितिकाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे आणि लिहिले की, “i love you… तू ज्या प्रकारची व्यक्ती आहेस त्याचा मला खूप अभिमान आहे. अशा परिस्थितीत मैदानात जाणे आणि अशी इनिंग खेळणे हे खूप शानदार होते.”
झेल घेताना झाली दुखापत
सामन्याच्या सुरुवातीलाच रोहित शर्माला दुखापत झाली होती. एक झेल पकडताना त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर रोहितलाही रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळानंतर तो स्टेडियममध्ये परतला, पण त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला पट्टी बांधलेली होती. अशा परिस्थितीत तो क्षेत्ररक्षणासाठी उतरला नाही. तसेच सलामीला फलंदाजीसदेखील आला नाही.
रोहित नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तिथून त्याने एकट्याच्या बळावर सामना जवळपास फिरवला. बोटाला दुखापत झाल्यानंतरही रोहितने २८ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात भारताला २० धावांची गरज होती. चेंडू मुस्तफिजुर रहमानच्या हातात होता आणि रोहित स्ट्राईकवर होता.
पण या षटकात रोहितला केवळ १५ धावाच करता आल्या आणि सामना बांगलादेशने ५ धावांनी जिंकला.
संबंधित बातम्या