मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Interview: रोहितच्या हिंदीवर विराट हसला; पाहा, दोन दिग्गजांमधील मजेशीर मुलाखत
Virat Kohli
Virat Kohli

Virat Kohli Interview: रोहितच्या हिंदीवर विराट हसला; पाहा, दोन दिग्गजांमधील मजेशीर मुलाखत

09 September 2022, 11:57 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma Takes Virat Kohli Interview: विराटला प्रश्न विचारत असताना रोहित शर्मा शद्ध हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विराट हसला. तसेत, प्रश्नाचे उत्तर देताना विराट हसत म्हणाला की, "माझ्याशी पहिल्यांदा हा एवढ्या शुद्ध हिंदीत बोलत आहे. यावर दोघेही मनमोकळे हसले.

विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्ध बहुप्रतिक्षित ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. गेल्या तीन वर्षापासून क्रिकेट चाहते या शतकाची प्रतिक्षा करत होते. विराटच्या या शानदार खेळीनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याची मुलाखत घेतली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या मुलाखतीत रोहितने सर्वप्रथम विराटचे ७१ व्या शतकासाठी अभिनंदन केले. त्यानंतर विराटला प्रश्न विचारताना तो म्हणाला की, "संपूर्ण देश तुमच्या या शतकाची वाट पाहत होता, आम्हाला माहित होते की ही इनिंग येईल आणि तुम्ही असे रेकॉर्ड बनवाल. या खेळीबद्दल काय सांगाल?

रोहितच्या हिंदीवर विराट हसला

या दरम्यान विराटला आपले हसू आवरणे कठीण झाले. कारण विराटला प्रश्न विचारत असताना रोहित शर्मा शद्ध हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे विराट हसला. तसेत, प्रश्नाचे उत्तर देताना विराट हसत म्हणाला की, "माझ्याशी पहिल्यांदा हा एवढ्या शुद्ध हिंदीत बोलत आहे. यावर दोघेही मनमोकळे हसले. त्यानंर रोहित यावर स्पष्टीकरण देत म्हणाला की, हिंदी आणि इंग्लीशमध्ये बोलायचा प्लॅन होता. पण हिंदीत चांगला रिदम मिळाला, त्यामुळे हिदीत बोलण्याचे ठरवले.

रोहित प्रश्नावर विराट काय म्हणाला-

विराटने रोहितचे आभार मानले आणि हा सामना त्याच्यासाठी खूप खास असल्याचे सांगितले. संघ जिंकण्याच्या इराद्याने आला होता आणि आमचे लक्ष्य टी-२० विश्वचषक जिंकण्याचे आहे. मी ब्रेकमधून परत आल्यापासून माझा दृष्टीकोन बदलला आहे. गेल्या १०-१२ वर्षात पहिल्यांदा मी महिनाभर बॅटला हात लावला नव्हता. पण पुनरागमन केल्यानंतर संघाने मला प्रचंड सपोर्ट केला. तसेच, पुनरागमन केल्यानंतर मी संघासाठी काय करू शकतो याबद्दल उत्सुक होतो. मधल्या षटकांमध्ये वेगाने धावा कशा करायच्या याबद्दल राहुलभाईंनी (राहुल द्रविड) तीन-चार दिवसांपूर्वी माझ्याशी चर्चा केली होती.

मला वाटले नव्हते मी टी-20 क्रिकेटमध्ये शतक करेन-

सोबतच विराट कोहली पुढे म्हणाला की, "या फॉरमॅटमध्ये आपण शतक झळकावू, अशी मला अपेक्षा नव्हती. या खेळीने मी स्वत:ही हैराण झाला आहे. तसेच, मोठे षटकार मारणे ही आपली ताकद नाही. टी-20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट वाढवण्यासाठी फक्त षटकार मारणे आवश्यक नाही, असेही विराट म्हणाला.