Rohit Sharma IPL: कमाईच्या बाबतीत रोहित शर्मानं धोनी-विराटला मागे टाकलं, IPL मधून कमावले तब्बल...
Rohit Sharma income from IPL: आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एकूण १७८.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात १७६.८४ कोटी रुपये कमावले आहेत.
Most Paid Players In IPL History: मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्याचबरोबर या संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील IPLचा सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्सशी जोडला गेला आहे. यापूर्वी रोहित शर्मा हैदराबाद डेक्कन चार्जर्सचा भाग होता. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमधून १७८.६ कोटी रुपये कमावले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
यादीत विराट,रैनाचाही समावेश
आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एकूण १७८.६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासात १७६.८४ कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय या यादीत विराट कोहली आणि सुरेश रैना यांचीही नावे आहेत. विराट कोहलीने आयपीएलमधून आतापर्यंत १७३.२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर आहे. सुरेश रैनाने १४ वर्षात या लीगमधून ११०.७ कोटी रुपये कमावले आहेत.
रोहित शर्मा २०११ पासून मुंबई इंडियन्ससोबत
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या मोसमात डेक्कन चार्जर्सने रोहित शर्माला ३ कोटी रुपयांना खरेदी केले होते. यानंतर रोहित शर्माला पुढील दोन सीझनसाठी ३-३ कोटी रुपये पगार म्हणून मिळाला. पण त्यानंतर २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला ९.२ कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केले होते. याशिवाय मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला २०१४ मध्ये १२.५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर २०१८ मध्येदेखील मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १५ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले. त्याच वेळी, आयपीएल २०२२ च्या मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.
संबंधित बातम्या