मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: आधी डोक्यावरील टोपी सेट केली अन् मग... लांबलचक प्रश्नावर रोहितची रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच

Rohit Sharma: आधी डोक्यावरील टोपी सेट केली अन् मग... लांबलचक प्रश्नावर रोहितची रिअ‍ॅक्शन, एकदा पाहाच

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 19, 2022 05:39 PM IST

Rohit Sharma reaction viral video: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० सप्टेंबरपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी पत्रकारपरिषद पार पडली. यावेळी एका पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच वैतागलेला दिसला.

Rohit Sharma
Rohit Sharma

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २० सप्टेंबरपासून तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेपूर्वी १८ सप्टेंबर रोजी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान रोहितने टीम कॉम्बिनेशन, अर्शदीप सिंग, विराट कोहली अशा सर्व मुद्द्यांवर उत्तरे दिली. पण एका प्रश्नामुळे त्याच्या चेहऱ्यावरील रंगच उडल्याचे पाहायला मिळाले.

पत्रकार परिषदेत रोहितला एका पत्रकाराने प्रथम टीम इंडियाबद्दल विचारले आणि नंतर झुलन गोस्वामीच्या निवृत्तीवर त्याची प्रतिक्रिया विचारली. या प्रश्नावर रोहितने आधी आपल्या डोक्यावरील टोपी व्यवस्थित सेट केली आणि मग हसून म्हणाला, 'इतका मोठा प्रश्न विचारता!.' हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रोहितला विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करण्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावर रोहितने स्पष्टपणे सांगितले की, ‘विराट हा बॅकअप सलामीवीर आहे, तर केएल राहुल हाच आपल्यासोबत डावाची सुरुवात करेल’. आशिया चषक २०२२ मध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात विराट आणि केएल राहुलने डावाची सुरुवात केली होती. त्या सामन्यात विराटने जवळपास तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. रोहितला त्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेचे वेळापत्रक-

पहिला T20 - २० सप्टेंबर (मोहाली)

दुसरा T20I - २३ सप्टेंबर (नागपूर)

तिसरा टी-20 -२५ सप्टेंबर (हैदराबाद)

WhatsApp channel

संबंधित बातम्या