मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: रोहित शर्मा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन, विराटला टाकले मागे

Rohit Sharma: रोहित शर्मा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन, विराटला टाकले मागे

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 26, 2022 05:45 PM IST

rohit sharma overtakes virat kohli in captiancy: भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतासाठी 42 सामने जिंकले आहेत.

Rohit Sharma
Rohit Sharma

रोहित शर्मा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने रविवारी तीन सामन्यांच्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला. पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय संघाने पुढच्या दोन्ही सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. या वर्षीचा भारताचा हा सहावा T20I मालिका विजय आहे. यापैकी ५ मालिका टीम इंडियाने रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकल्या आहेत.

हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर रोहित टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. कर्णधार म्हणून रोहितचा T20I सामन्यातील हा ३३ वा विजय आहे.आता त्याने भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक T20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताला ४२ सामने जिंकून दिले आहेत.

T20I मध्ये सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार

एमएस धोनी - ७२ सामन्यात ४२ विजय

रोहित शर्मा - ४२ सामन्यांत ३३ विजय

विराट कोहली - ५० सामन्यांमध्ये ३२ विजय

ऑस्ट्रेलियानंतर आता भारत आफ्रिकेशी दोन हात करणार

भारतीय क्रिकेट संघ T20 विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांची मालिका २८ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानंतर पुढील महिन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत ३ वनडे सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकासाठी रवाना होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 मालिका-

पहिला T20I - २८ सप्टेंबर (त्रिवेंद्रम)

दुसरा T20I - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)

तिसरा T20I - ४ ऑक्टोबर (इंदूर)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका-

पहिला वनडे- ६ ऑक्टोबर (लखनौ)

दुसरा वनडे- ९ ऑक्टोबर (रांची)

तिसरा वनडे- ११ ऑक्टोबर (दिल्ली)

WhatsApp channel

संबंधित बातम्या