मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: पराभवातून धडा नाहीच! रोहित म्हणतोय, हाच संघ T20 वर्ल्डकप खेळणार

Rohit Sharma: पराभवातून धडा नाहीच! रोहित म्हणतोय, हाच संघ T20 वर्ल्डकप खेळणार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Sep 07, 2022 03:21 PM IST

Rohit Sharma on T20 World Cup team: सुपर ४ मधील दोन्ही पराभवांमुळे संघाच्या मनोधैर्यावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केले आहे. तसेच, टीम इंडिया आपले मिशन विश्वचषक घेऊन पुढे जात आहे. वर्ल्डकपसाठी भारताचा हाच संघ असणार असल्याचेही रोहित शर्माने सांगितले आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma

टीम इंडियाचा आशिया कप २०२२ मधील प्रवास जवळपास संपला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाला फायनल गाठणे फार कठीण झाले आहे. यासाठी टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ शेवटच्या षटकात पराभूत झाला.

अशा परिस्थितीत भारताचा हाच संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी पुर्णपणे तयार आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने उत्तर दिले आहे. 

पत्रकार परिषदेत रोहित शर्मा काय म्हणाला

श्रीलंकविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला की, " विश्वचषकासाठी आमचा संघ जवळपास निश्चित झाला आहे. वर्ल्डकपच्या संघात ९०-९५ खेळाडू आशिया चषक खेळणारेच असू शकतात, असे रोहितने स्पष्ट सांगितले आहे. 

तसेच, रोहित पुढे म्हणाला की, “आशिया चषकानंतर आम्हाला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. सोबतच जोपर्यंत टी-20 विश्वचषकासाठी संघ जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही अनेक खेळाडूंना आजमावू. सध्याचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी ९०-९५ टक्के पूर्णपणे सज्ज आहे. गरज पडली तर काही किरकोळ बदल केले जातील”.

सोबतच “आम्ही अनेक सामने खेळत आहेत. सातत्याने चांगले निकालही दिले आहेत. अशा परिस्थितीत, सलग दोन सामने हरणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतो”, असेही रोहितने सांगितले.

टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

टीम इंडियाने आशिया चषकाची सुरुवात सलग दोन विजयांनी केली होती. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सनी पराभव केला होता. त्यानंतर हाँगकाँगला ४० धावांनी धुळ चारली. पण सुपर-४ मध्ये टीम इंडिया फ्लॉप ठरली. संघाने सलग दोन सामने गमावले आहेत.

सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा ५ गडी राखून पराभव केला. त्यानंतर श्रीलंकेनेही भारताला ६ विकेट्सने पराभूत केले. अशा स्थितीत आता टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. 

WhatsApp channel

संबंधित बातम्या