मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Video : हिटमॅन फक्त नाव नाही तर देशाची भावना! MI ने पोस्ट केला आपल्या कॅप्टनसाठी खास व्हिडीओ
Rohit Sharma video mumbai indians
Rohit Sharma video mumbai indians

Rohit Sharma Video : हिटमॅन फक्त नाव नाही तर देशाची भावना! MI ने पोस्ट केला आपल्या कॅप्टनसाठी खास व्हिडीओ

29 April 2023, 16:58 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma video mumbai indians : आयपीएल 2023 मध्ये रोहित शर्माची बॅटही आतापर्यंतच्या बहुतांश सामन्यांमध्ये शांत राहिली आहे. रोहितने IPL 2023 च्या ७ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. पण मुंबई इंडियन्सने रोहितसाठी एक शानदार व्हिडीओ पोस्ट केला आहे.

mumbai indians video on rohit sharma : आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आहे. २०१३ मध्ये रोहित शर्माला मुंबईचा कर्णधार बनवण्यात आले. म्हणजेच यंदा दहाव्यांदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवत आहे. या १० वर्षांत या संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वात आतापर्यंत एकूण ५ विजेतेपदे जिंकली आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मात्र, आयपीएल 2023 मध्ये या संघाची कामगिरी आतापर्यंत फारशी खास राहिलेली नाही. मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलवर ८व्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या ७ सामन्यांमध्ये या संघाने तीन सामने जिंकले आहेत, तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रोहित शर्मासाठी खास व्हिडिओ

मुंबईच्या चाहत्यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या फलंदाजीवर नेहमीच विश्वास दाखवला आहे. मुंबई इंडियन्सने (mumbai indians video on rohit sharma)  त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्मासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माच्या कर्णधार आणि फलंदाजीचे खूप कौतुक करण्यात आले. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये रॅपचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 𝐇𝐈𝐓𝐌𝐀𝐍 𝘴𝘪𝘳𝘧 𝘯𝘢𝘢𝘮 𝘯𝘢𝘩𝘪 𝘩𝘢𝘪, 𝐄𝐌𝐎𝐓𝐈𝐎𝐍 𝘩𝘢𝘪 𝘥𝘦𝘴𝘩 𝘬𝘢।"

३० एप्रिलला रोहित शर्माचा वाढदिवस

मुंबई इंडियन्सचा (mumbai indians) कर्णधार रोहित शर्मा ३० एप्रिल रोजी ३६ वर्षांचा होणार आहे. हा शानदार व्हिडीओ पोस्ट करून रोहितच्या (Rohit Sharma Birthday) बर्थडेची तयारी सुरू झाल्याचे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे चाहते म्हणत आहेत.

या मोसमात रोहितची बॅट शांत

यंदा रोहित शर्माची बॅटही आतापर्यंतच्या बहुतांश सामन्यांमध्ये शांत राहिली आहे. रोहित शर्माच्या IPL 2023 च्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने ७ सामन्यात १८१ धावा केल्या आहेत. मात्र, हिटमॅनची बॅट चालली तर मोठ-मोठ्या गोलंदाजांना घाम फुटतो. रोहित शर्माचा फॉर्म सध्या त्याला साथ देत नसला तरी या अनुभवी फलंदाजाला हलक्यात घेण्याची चूक कोणताही विरोधी संघ करू शकत नाही.

पुढचा सामना राजस्थानविरुद्ध

मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रविवारी (२९ एप्रिल) राजस्थानविरुद्ध आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर आता संघाला प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे.