Rohit Sharma Injury: रोहित शर्मा सेमी फायनल खेळणार की नाही? हिटमॅनच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Injury: रोहित शर्मा सेमी फायनल खेळणार की नाही? हिटमॅनच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट

Rohit Sharma Injury: रोहित शर्मा सेमी फायनल खेळणार की नाही? हिटमॅनच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट

Published Nov 08, 2022 11:30 AM IST

Rohit Sharma Injury Update: रोहित शर्माच्या दुखापतीची बातमी समोर आली. तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करायला सुरुवात केली होती. मात्र, रोहितने पुन्हा सराव सुरु केला असून सेमीफायनल खेळण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma Injury Update
Rohit Sharma Injury Update

india vs england semi final: T20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. १० नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. अॅडलेडमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ सरावात व्यस्त आहे. दरम्यान, मंगळवारी टीम इंडिया सराव करत असताना एक मोठी घटना घडली. कर्णधार रोहित शर्मा सराव करताना दुखापतग्रस्त झाला. फलंदाजी करताना त्याच्या हाताला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांची चिंता वाढली होती. मात्र आता रोहित शर्माच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

टीम इंडिया अॅडलेडमध्ये फलंदाजीचा सराव करत होती, त्यावेळी रोहित शर्मा फलंदाजीसाठी आला. या दरम्यान थ्रो डाऊन स्पेशालिस्टचा बॉल खेळताना रोहित शर्माच्या हाताला मार लागला, त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याला ताबडतोब नेट सेशन मध्येच सोडावे लागले. यानंतर फिजिओने मैदानावरच रोहितवर उपचार केले. रोहित आणि टीम इंडियाची रिअॅक्शन पाहता दुखापत गंभीर असू शकते असे वाटले होते, पण चांगली गोष्ट म्हणजे थोड्या विश्रांतीनंतर रोहित पुन्हा नेटमध्ये सराव करताना दिसला.

रोहित शर्माच्या दुखापतीची बातमी समोर आली. तेव्हा चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त करायला सुरुवात केली होती. मात्र, रोहितने पुन्हा सराव सुरु केला असून सेमीफायनल खेळण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या