मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma: डान्स, म्युझिक अन् बरंच काही... वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मानं सांगितला कमबॅक प्लॅन
Rohit Sharma
Rohit Sharma

Rohit Sharma: डान्स, म्युझिक अन् बरंच काही... वनडे मालिकेपूर्वी रोहित शर्मानं सांगितला कमबॅक प्लॅन

07 January 2023, 15:54 ISTRohit Bibhishan Jetnavare

Rohit Sharma video: रोहित शर्मा वनडे मालिकेत कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. यासंदर्भात हिटमॅनने तयारी सुरू केली आहे. रोहित सध्या जीममध्ये खूप घाम गाळत आहे. त्याने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना आणि डान्स करताना दिसत आहे.

INDIA VS SRI LANKA ODI series भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. अनफिट रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे टी-20 मालिकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

रोहित शर्मा वनडे मालिकेत कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. यासंदर्भात हिटमॅनने तयारी सुरू केली आहे. रोहित सध्या जीममध्ये खूप घाम गाळत आहे. त्याने स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना आणि डान्स करताना दिसत आहे.

डान्ससोबतच रोहित शर्मा कठोर परिश्रम अर्थात जिम करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच रोहित शर्माने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'तेच करा जे तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल.' या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेहनेही कमेंट केली आहे. तिने दोन काळ्या हृदयांसह फायरचा इमोजी शेअर केला आहे.

रोहित शर्माने नुकतीच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय मालिका खेळली होती. याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी हिटमॅन जिममध्ये वेट्ससह स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर देत आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो जिममध्ये घाम गाळताना दिसत आहे. रोहित जीममध्ये कसली ट्रेनिंग करणार हेही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

भारत-श्रीलंका वनडे मालिका

पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)

दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)

तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम)