मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA T20: शेवटच्या सामन्यात दिसली धोनीची झलक, 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल

IND vs SA T20: शेवटच्या सामन्यात दिसली धोनीची झलक, 'हा' व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Oct 05, 2022 11:40 AM IST

Rohit Sharma gave trophy to Shahbaz Ahmed IND vs SA: टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकली आहे. मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्माने विजयी ट्रॉफी शाहबाज अहमदच्या हातात दिली. रोहितची ही कृती चाहत्यांना प्रचंड आवडलेली दिसत आहे.

IND vs SA T20
IND vs SA T20

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा ४९ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या. आफ्रिकेकडून रिली रोसोने ४८ चेंडूत नाबाद १०० धावा चोपल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १८.३ षटकांत १७८ धावांत गारद झाला. भारताकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ४१ धावा केल्या.

मात्र, या पराभवाचा मालिकेच्या निकालावर कोणताही परिणाम झाला नाही. कारण भारताने याआधीच मालिका २-१ ने जिंकली होती. टीम इंडिया ने पहिला टी-20 ८ विकेटने आणि दुसरा टी-20 सामना १६ धावांनी जिंकला होता.

रोहितने ट्रॉफी शाहबाजच्या हातात दिली

दरम्यान, मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा ने एक असे काम केले आहे, जे पाहून सर्वांना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ची आठवण आली. रोहितच्या या कृत्यानंतर चाहत्यांनी त्याचे प्रचंड कौतुकदेखील केले आहे. वास्तविक, सामन्यानंतर रोहित शर्माला जेव्हा ट्रॉफी देण्यात आली तेव्हा त्याने ती ट्रॉफी संघातील उपस्थित सर्वात लहान खेळाडू शाहबाज अहमदच्या हातात दिली. यानंतर टीम इंडियाने विजय साजरा केला.

धोनीने सुरु केलेली प्रथा आजतागायत सुरु

टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही रोहित शर्माला ट्रॉफी दिल्याचे पाहू शकता. तो ट्रॉफी घेऊन येतो आणि शाहबाज अहमदला देतो आणि स्वतः जाऊन बाजूला उभा राहतो. सेलिब्रेशनचा हा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

रोहितची ही कृती लोकांना खूप आवडली. या गोष्टीची सुरुवात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने केली होती, तेव्हापासून आजतागायत ही प्रथा सुरू आहे.

शाहबाजला मिळाली नाही पदार्पणाची संधी

या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये सामील झालेल्या २७ वर्षीय शाहबाज अहमदला डेब्यूची संधी मिळू शकली नाही. मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा शेवटच्या सामन्यात संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करेल, अशी अपेक्षा होती. शाहबाज हा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलचे २९ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने फलंदाजी करताना २७९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत १३ विकेट्स घेतल्या आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या