Rohit Sharma T20 WC: रोहित शर्मा रडला तर विराटनं टोपीनं लपवला चेहरा, टीम इंडिया निराश
मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma T20 WC: रोहित शर्मा रडला तर विराटनं टोपीनं लपवला चेहरा, टीम इंडिया निराश

Rohit Sharma T20 WC: रोहित शर्मा रडला तर विराटनं टोपीनं लपवला चेहरा, टीम इंडिया निराश

Published Nov 10, 2022 05:51 PM IST

Rohit Sharma Crying T20 WC: भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंग्लंडने हा सामना १० गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. आता फायनलमध्ये त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झालेला दिसला. तर विराटकोहली टोपीच्या साह्याने आपले तोंड लपवताना दिसला.

Rohit Sharma Crying T20 WC
Rohit Sharma Crying T20 WC

India vs England T20 World Cup 2nd Semi Final: सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने धुव्वा उडवला. इंग्लंडने १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात एकही विकेट न गमावता १७० धावा करत सामना जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. भारताच्या सहापैकी ४ गोलंदाजांनी आज १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या.

दरम्यान, या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. डगआऊटमध्ये तो बराच वेळ राहुल द्रविडसोबत बोलताना दिसत होता. दोघे काही वेळ बोलले आणि त्यानंतर रोहित शर्मा भावूक झाला, त्यावेळी रोहित शर्माच्या डोळ्यातून अश्रू तरळातानाही दिसले.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीही मैदानात खूपच निराश दिसला. या अशा लाजिरवाण्या पराभवानंतर तो टोपीने तोंड लपवताना दिसला.

टीम इंडिया पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी स्पर्धेत खेळत होती. भारताने सेमी फायनलपर्यंत मजला मारली. पण सेमी फायनलमध्ये संघाचा प्रवास संपुष्टात आला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या